दुसऱ्या दिवशी भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 06:13 PM2020-02-09T18:13:55+5:302020-02-09T18:15:12+5:30

वडांगळी : देशातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता-सामतदादा यात्रोत्सवाच्या दुसºया दिवशी सुमारे चार लाखांहून अधिक भाविकांनी ...

The next day the devotees of Mandi | दुसऱ्या दिवशी भाविकांची मांदियाळी

दुसऱ्या दिवशी भाविकांची मांदियाळी

Next
ठळक मुद्देवडांगळी : सतीमाता-सामतदादांच्या दर्शनासाठी स्थानिकांच्या मोठ्या रांगा

वडांगळी : देशातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता-सामतदादा यात्रोत्सवाच्या दुसºया दिवशी सुमारे चार लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. नवसपूर्तीसाठी सुमारे साडे तीन हजारांहून बोकडांचे बळी देण्यात आले. शनिवारी सायंकाळपासून बंजारा भाविक सतीमातेचरणी लीन होण्यासाठी मिळेल त्या वाहनाने दाखल होत आहेत. त्यामुळे वडांगळी गाव यात्रेकरूंच्या गर्दीने फुलून निघाले आहे.
रविवारी पहाटे जिल्हा परिषद सदस्य वैशाली खुळे व दीपक खुळे, सरपंच सुवर्णा कांदळकर व रामनाथ कांदळकर यांच्या हस्ते अनुक्रमे सतीमाता व सामतदादा यांची महापूजा करण्यात आली. यावेळी विश्वस्त अशोक चव्हाण, अशोक खुळे, रमेश खुळे, उपसरपंच किशोर खुळे, शरद खुळे, पोपट सैद, रमेश राठोड, अरु ण कुलकर्णी उपस्थित होते.
शनिवारी सायंकाळी ४ वाजून २ मिनिटांनी पौर्णिमेला प्रारंभ झाला. त्यातच शनिवार हा वार बोकडबळीसाठी निषिद्ध मानला जात असल्याने शनिवारी तुरळक प्रमाणात बोकडबळी देण्यात आले. तथापि, रविवार हा सुटीचा दिवस असल्याने रात्री उशिरापर्यंत सुमारे चार लाखांहून अधिक भाविकांनी सतीमता-सामतदादा चरणी लीन होत दर्शन घेतले. यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेत देवीच्या पूजा साहित्यापासून बंजारा भाविकांच्या आभूषणांची लहान-मोठी दुकाने थाटली असून, त्यावर खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहेत. यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने सतीमाता व सामतदादा यांच्या प्रति असलेला भक्तीभाव व नवसपूर्तीसाठी राज्यभरातून मिळेल त्या वाहनाने यात्रेकरू येथे दाखल होत असल्याचे चित्र दिसून आले.
दोन दिवसांपासूनच वडांगळीच्या दिशेने हजारो बंजारा भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. शनिवारी सायंकाळपासूनच येथे बस, ट्रक, टेम्पो व मिळेल त्या वाहनांद्वारे भाविक येथे दाखल होत आहेत. बसस्थानक व देवी मंदिराच्या परिसरात मिळेल त्या ठिकाणी भाविक राहुट्या करून उतरले आहेत. जागोजागी तीन दगडांच्या चुली मांडून त्यावर बंजारा भगिनींकडून मांस शिजविले जात होते. सतीमातेस गोड शिºयाचा तर सामतदादास मांस व मद्याचा नैवैद्य दाखविला जात होता. आज सरकारमान्य देशी दारू व परिसरातील बिअर बार परिसरात यात्रेकरूंची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. यात्रोत्सवात चोख बंदोबस्त बजाविण्यासाठी पोलिसांची कुमक येथे शुक्रवारपासूनच दाखल झाली आहे. आरोग्य विभागाची १०८ व साधी रुग्णवाहिका या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. म्हाळोबा-बिरोबा मंदिर, बाजारतळ तसेच गावात मोकळी जागा मिळेल त्या ठिकाणी बंजारा भाविकांनी आपल्या राहुट्या ठोकल्या असल्याचे चित्र दिसून आले. यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सरपंच सुवर्णा कांदळकर, उपसरपंच किशोर खुळे, ग्रामपंचायत सदस्य एन. जे. खुळे, शरद खुळे, विनायक खुळे, ग्रामविकास अधिकारी पी. एस. सोळंके, रामनाथ कांदळकर आदी परिश्रम घेत आहेत.

चौकट-
कडवाच्या कालव्यास पाणी आवर्तन सोडल्याने समाधान
यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी कडवा कालव्यास पाणी सोडण्यात येते. त्यामुळे भाविकांच्या आंघोळीची व भांडे धुण्याची व्यवस्था होत असते. कडवा कालव्यास आवर्तन सोडण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. सतीमातेस शाकाहारी तर सामतदादास मांसाहार चालत असल्याने ही परंपरा टिकविण्यासाठी येथे येणारे बंजारा भाविक सतीमातेस गोड शिºयाचा तर सामतदादास मांस व मद्याचा नैवेद्य दाखविला जातो. अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा टिकविण्यासाठी समाजातील अनेक भाविक आजही बोकडबळी देऊन नवसपूर्ती करीत आहेत.

चौकट-
सरपंच सुवर्णा कांदळकर यांच्या पुढाकाराने यंदाच्या वर्षी सतीमाता- सामतदादा संस्थानच्या वतीने मंदिरापासून सुमारे तीनशे मीटर अंतरावर नव्याने वधगृह बांधण्यात आले आहे. मंदिरापासून ते वधगृहापर्यंत जाण्यासाठी सीमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. भाविक या रस्त्याचा वापर करून शिस्तीने वधगृहापर्यंत बोकड नेत असल्याचे चित्र दिसून आले.

टीप- वडांगळी यात्रा फोटो प्रशांत खरोटे यांनी काढलेले आहेत. सदरचे फोटो या बातमीत वापरणे ही विनंती.

Web Title: The next day the devotees of Mandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.