गंगापूरच्या जलपूजनाला राष्टÑवादीचा ‘वन्स मोअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:23 AM2020-09-20T01:23:33+5:302020-09-20T01:24:56+5:30

गंगापूर धरण पूर्ण भरल्याने देवळालीच्या आमदार सरोज अहिरे व माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी स्वतंत्र जलपूजन केल्याने धरणातील पाण्याला पुन्हा राजकीय रंग चढण्याची चिन्हे आहेत.

NCP's 'Once More' to Gangapur water worship | गंगापूरच्या जलपूजनाला राष्टÑवादीचा ‘वन्स मोअर’

गंगापूरच्या जलपूजनाला राष्टÑवादीचा ‘वन्स मोअर’

googlenewsNext
ठळक मुद्देधरण राजकारण : सरोज अहिरे, पिंगळे यांचा पुढाकार

नाशिक : गंगापूर धरण पूर्ण भरल्याने देवळालीच्या आमदार सरोज अहिरे व माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी स्वतंत्र जलपूजन केल्याने धरणातील पाण्याला पुन्हा राजकीय रंग चढण्याची चिन्हे आहेत.
नाशिक शहरासह मराठवाड्याची तहान भागवणारे गंगापूर धरण ९५ टक्के भरल्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने महापौर सतीश कुलकर्णी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी गत महिन्यात जलपूजन केले होते. त्यानंतर शनिवारी राष्टÑवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी माजी खासदार देवीदास पिंगळे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन शासकीय जलपूजन केल्याचा दावा केला आहे.
धरणाचे काही पाणी आणि क्षेत्र देवळाली मतदारसंघात असूनसुद्धा स्थानिक शेतकºयांना आत्तापर्यंत पूजनाचा मान मिळालेला नाही. त्यामुळे जलसंपत्ती टिकवण्यासाठी शेतकºयांना सोबत घेऊन ही शासकीय पूजन करण्यात आल्याचे आमदार अहिरे यांनी सांगितले.
गंगापूर धरणाचे दोनदा जलपूजन झाल्याने नाशिकसह मराठवाड्याची तहान भागवणाºया पाण्यावरून राजकारण झाले असल्याची चर्चा सुरू आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांना कळविण्यात आल्याचे अहिरे यांनी सांगितले. यावेळी नासाकाचे माजी चेअरमन मुरलीधर पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, मविप्र संचालक सचिन पिंगळे,पंचायत समिती सभापती विजयश्री कांडेकर, उपसभापती ढवळू फसाळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: NCP's 'Once More' to Gangapur water worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.