कॉँग्रेसच्या सभापतिपदासाठी राष्टवादीची प्रतिष्ठापणाला !

By श्याम बागुल | Published: January 3, 2020 07:33 PM2020-01-03T19:33:35+5:302020-01-03T19:35:00+5:30

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या ताब्यात येऊन अंगावरील गुलाल झटकत नाही तोच विषय समित्यांच्या वाटपावरून महाविकास आघाडीत खटके उडाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या सदस्यांना शहरातील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.

Nationalist establishment for the post of Congress president! | कॉँग्रेसच्या सभापतिपदासाठी राष्टवादीची प्रतिष्ठापणाला !

कॉँग्रेसच्या सभापतिपदासाठी राष्टवादीची प्रतिष्ठापणाला !

Next
ठळक मुद्देशिवसेनेकडून अडवणूक : राष्टवादीत सभापतिपदासाठी आमदारांचे लॉबिंग राष्टवादीने वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देऊन हॉटेल सोडले.

लोकमत न्यूज नेटवर्क 
नाशिक : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पदरात पडल्यानंतर अवघ्या काही तासांतच शिवसेनेने भूमिका बदलत कॉँग्रेसला विषय समित्यांचे सभापतिपद देण्यास नकार देतानाच राष्टवादीची एका सभापतिपदावर बोळवण करण्यास निघालेल्या सेनेला अखेरच्या क्षणी राष्टवादीच्या नेत्यांनी चांगलाच झटका दिला. महाविकास आघाडीत कॉँग्रेसपक्ष सहभागी असल्याने या पक्षाला सभापतिपद न दिल्यास भाजपबरोबर जाण्याची राष्टवादीने तयारी करताच, शिवसेनेला नमते घ्यावे लागले व कॉँग्रेसच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादीला प्रतिष्ठापणाला लावावी लागली.


जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या ताब्यात येऊन अंगावरील गुलाल झटकत नाही तोच विषय समित्यांच्या वाटपावरून महाविकास आघाडीत खटके उडाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या सदस्यांना शहरातील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. या ठिकाणी रात्री सेना, राष्टवादी व कॉँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सेनेकडून भाऊसाहेब चौधरी, विजय करंजकर, आमदार सुहास कांदे आदी पदाधिकारी होते, तर राष्टवादीकडून माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, कोंडाजी मामा आव्हाड, रवींद्र पगार आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेने आपली सदस्यसंख्या अधिक असल्याने राष्टवादीला एकच सभापतिपद दिले जाईल असे सांगून शिवसेनेचे २५ सदस्य व अपक्ष, माकपाच्या सदस्यांचाही आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला. सदस्य संख्येचा विचार करून राष्टवादीचे १८ सदस्य असल्याने फक्त एक सभापतिपद देण्याची तयारी शिवसेनेने केली, तर कॉँग्रेस पक्षाचे दोन सदस्यदेखील सेनेच्या बाजूचे असल्याने कॉँगे्रसला सभापतिपद देण्यास त्यांनी थेट नकार दिला. राष्टÑवादीच्या नेत्यांनी या संदर्भात सेनेशी तडजोड करण्याची तयारी दर्शवित सेनेला अध्यक्षपदासारखे महत्त्वाचे पद दिल्याने उर्वरित चारही समित्या राष्ट्रवादी व काँग्रेसला देण्यात यावे असा आग्रह धरला. कॉँग्रेस महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याने एक सभापतिपद द्यावेच लागेल, असा आग्रह राष्टवादीने धरला व तसे न झाल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देऊन हॉटेल सोडले.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी समीर भुजबळ यांनी हॉटेलमध्ये थांबलेल्या राष्टवादी व कॉँग्रेसच्या सदस्यांना भुजबळ फॉर्मवर बोलावणे धाडून थेट भाजपशी संपर्क साधला. राष्ट्रवादी, कॉँग्रेस व भाजपच्या संख्याबळाच्या आधारे सर्व समित्या ताब्यात घेण्याचे डावपेच सुरू झाले. याची माहिती सेनेला मिळताच, संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, आमदार नरेंद्र दराडे, सुहास कांदे आदींनी तत्काळ भुजबळ फॉर्म गाठून राष्टवादी व कॉँग्रेसची मनधरणी करीत, दोन विषय समित्यांचे सभापतिपद देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीचा गाडा पुढे सरकला
चौकट===


आमदारांचे लॉबिंग
विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी महाविकास आघाडीतच रस्सीखेच सुरू असताना राष्टवादी कॉँग्रेसमध्ये मात्र विद्यमान आमदारांनी आपापल्या समर्थकांसाठी जोरदार लॉबिंग केले. आमदार दिलीप बनकर यांनी विषय समितीच्या सभापतिपदासाठी संजय बनकर यांच्या नावाला विरोध दर्शवून त्याऐवजी निफाडचे सिद्धार्थ वनारसे यांचे नाव पुढे केले तर सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी कन्या सीमंतिनी कोकाटे यांच्यासाठी आग्रह धरला. मुळात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद निफाड तालुक्याला दिलेले असताना पुन्हा त्याच तालुक्यात सभापतिपद देणे योग्य होणार नसल्याची भूमिका समीर भुजबळ यांनी मांडली, तर सीमंतिनी कोकाटे या भाजपच्या सदस्य असून, त्यांना राष्टवादीकडून सभापतिपदाचे उमेदवार ठरविणे तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे पटवून देण्यात आले. त्यामुळे लॉबिंग करणाऱ्या दोन्ही आमदारांनी नाराज होऊन काढता पाय घेतला.

Web Title: Nationalist establishment for the post of Congress president!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.