पाच हजार विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 01:42 AM2019-11-18T01:42:07+5:302019-11-18T01:42:40+5:30

जिल्ह्यातील १८ परीक्षा केंद्रांवर रविवारी (दि.१७) जिल्हाभरातून सुमारे ५ हजार ३४८ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेला जिल्हाभरातून ५ हजार ५९६ विद्यार्थ्यांनी नियमित व ८ विद्यार्थ्यांनी विलंब शुल्कासह मुदतीत नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ३४८ विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थिती लावली, तर १९६ विद्यार्थ्यांनी मात्र या परीक्षेला दांडी मारल्याची माहिती सूत्रांनी दिली.

National Knowledge Search Examination conducted by five thousand students | पाच हजार विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा दिल्यानंतर परीक्षा केंद्रातून बाहेर पडणारे विद्यार्थी.

Next
ठळक मुद्दे१८ केंद्रांवर नियोजन : बौद्धिक, शालेय क्षमतेची कसोटी

नाशिक : जिल्ह्यातील १८ परीक्षा केंद्रांवर रविवारी (दि.१७) जिल्हाभरातून सुमारे ५ हजार ३४८ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेला जिल्हाभरातून ५ हजार ५९६ विद्यार्थ्यांनी नियमित व ८ विद्यार्थ्यांनी विलंब शुल्कासह मुदतीत नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ३४८ विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थिती लावली, तर १९६ विद्यार्थ्यांनी मात्र या परीक्षेला दांडी मारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेसाठी दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट होता येते. राज्यभरातून एकूण ९४ हजार ५१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, या सुमारे ७ हजार ९० शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापूर्वी राज्यभरातून ८६ हजार २८१ विद्यार्थी बसले होते. यातील २६१ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. नाशिक जिल्ह्यात यावर्षी वेगवेगळ्या १८ परीक्षा केंद्रांवर जिल्हाभरातील सुमारे ५ हजार ३४८ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा दिली, तर १९६ विद्यार्थ्यांनी मात्र या परीक्षेला दांडी मारली.
परीक्षेचा पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत बौद्धिक क्षमता चाचणी, तर दुसरा पेपर दुपारी १.३० ते ३.०० या वेळेत शालेय क्षमता चाचणी घेण्यात आली. दोन्ही पेपरमध्ये प्रत्येकी १०० गुणांचे शंभर प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान, या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर एक महिन्याच्या कालावधीत जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: National Knowledge Search Examination conducted by five thousand students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.