राज विसरेनात नाशिकची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:55 PM2019-10-14T22:55:25+5:302019-10-15T00:57:42+5:30

राज ठाकरे यांची नाशिकमधील सत्ता जाऊन दोन वर्षे झाली. सत्ता जाताना मनसेचे नगरसेवक देखील पक्षांतर करून गेले आणि पूर्ण बहुमताने भाजपची सत्ता आली; परंतु राज यांच्या मनातून नाशकातील पहिली सत्ता मात्र विस्मरणात जात नसून त्यामुळेच मुंबईत सध्या होत असलेल्या सभांमध्ये नाशिकमधीलच उदाहरणे ते देत आहेत.

Nashik's rule in Raj forget | राज विसरेनात नाशिकची सत्ता

राज विसरेनात नाशिकची सत्ता

Next
ठळक मुद्देमुंबईतील सभेत संदर्भ : ‘लाव रे तो व्हिडीओ’ बंद!

नाशिक : राज ठाकरे यांची नाशिकमधील सत्ता जाऊन दोन वर्षे झाली. सत्ता जाताना मनसेचे नगरसेवक देखील पक्षांतर करून गेले आणि पूर्ण बहुमताने भाजपची सत्ता आली; परंतु राज यांच्या मनातून नाशकातील पहिली सत्ता मात्र विस्मरणात जात नसून त्यामुळेच मुंबईत सध्या होत असलेल्या सभांमध्ये नाशिकमधीलच उदाहरणे ते देत आहेत.
लोकसभा निवडणुकीतील जाहीर सभांचे मैदान राज यांनी उमेदवार रिंगणात न आणताही गाजवले; परंतु त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. त्यानंतर निवडणूक लढवावी किंवा नाही, अशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या मनसेने मुंबई, पुणे आणि नाशिक याच ठिकाणी उमेदवार देण्याची घोषणा केली. त्यानंतर ते प्रचाराच्या मैदानात उतरले असून, मुंबईत ठिकठिकाणी त्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत. या सभेत मुंबईतील खड्ड्यांच्या तुलनेत नाशिकमध्ये कसे गुळगुळीत रस्ते आहेत आणि नाशिकमध्ये सत्ता असताना आपण कशी ठेकेदारांना तंबी दिली होती त्याचे ते आवर्जून उदाहरणे देत आहेत. त्यातून नाशिकची पहिली सत्ता राज हे विसरू शकत नसल्याचेदेखील स्पष्ट होते.
राज यांनी शिवसेना सोडली त्यावेळी त्यांना मुंबई, पुणे आणि नाशिकमध्येच सर्वाधिक प्रतिसाद मिळाला होता. मनसे स्थापन झाल्यानंतर २००९मध्ये नाशिक शहरातून तीन आमदार मनसेचे निवडून आले होते. पाच वर्षांत मात्र पक्षाची घसरगुंडी झाली. सध्या मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे मुंबईच्या सभेत इतकी कामे करूनही नाशिककरांनी सत्ता नाकारली, याची खंतही ते व्यक्त करतात.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी जाहीर सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील विसंगती पुराव्यानिशी दाखवण्यासाठी व्यासपीठावर व्हिडीओ दाखवण्याची पद्धत सुरू केली. त्यावेळी ‘लाव रे तो व्हिडीओ’ अशी राज यांची सूचना गाजली होती. त्याचप्रमाणे सोशल मीडिवर राज हे ट्रोल झाले होते. राज यांनीच आधी आघाडीच्या विरोधात केलेली वक्तव्ये आणि नंतर केलेले समर्थन याचे व्हिडीओही सोशल मीडियावर गाजले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत राज यांनी व्हिडीओ लावण्याचेच बंद केले आहे.

Web Title: Nashik's rule in Raj forget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.