जिल्ह्यात डाळिंब, चिकू, लिंबू फळपीक विमा योजनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:48 PM2021-06-24T16:48:26+5:302021-06-24T16:52:40+5:30

चिकू फळपिकासाठी ६० हजार रुपये भरपाई मिळणार आहे. त्यासाठी विमाहप्ता रक्कम ३ हजार रुपये इतकी असणार आहे, तर लिंबू फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ७० हजार रुपये भरपाई आहे. द्राक्ष फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये

nashik,pmegranate,chiku,lemon,fruit,crop,insurance,scheme,in,the,district | जिल्ह्यात डाळिंब, चिकू, लिंबू फळपीक विमा योजनेत

जिल्ह्यात डाळिंब, चिकू, लिंबू फळपीक विमा योजनेत

Next
ठळक मुद्देशासनाचा निर्णय: पेरू, द्राक्ष या पिकांचाही समावेशद्राक्ष फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये



नाशिक : पुनर्रचित हवामानावार आधारित फळपीक विमा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नाशिक जिल्ह्यातील डाळिंब, चिकू, लिंबू, पेरू, द्राक्ष या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.
डाळिंब फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ३९ हजार रुपये भरपाई मिळणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना १५ जुलै ते १५ ऑक्टोबर या दरम्यान पावसाचा खंड झाल्यास भरपाईस पात्र ठरतील. तसेच १६ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत जास्त पाऊस झाल्यास भरपाईस पात्र ठरतील. त्यासाठी विमा हप्ता रक्कम ६ हजार ५०० रुपये इतकी असल्याचे कळविण्यात आले आहे. पेरू फळपिकाची विमा संरक्षित रक्कम ६० हजार रुपये भरपाई मिळणार आहे. त्यासाठी विमाहप्ता रक्कम ३ हजार रुपये इतका आहे.

चिकू फळपिकासाठी ६० हजार रुपये भरपाई मिळणार आहे. त्यासाठी विमाहप्ता रक्कम ३ हजार रुपये इतकी असणार आहे, तर लिंबू फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ७० हजार रुपये भरपाई आहे. द्राक्ष फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये असून, विमाहप्ता ६४ हजार रुपये इतका आहे.
शासनाच्या संकेतस्थळावर तसेच कृषी विभागातही याबाबतची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन करावा लागणार आहे. महसूल मंडळातील महावेध प्रकल्प अंतर्गत स्वयंचलित हवामान केंद्रामार्फत प्राप्त आकडेवारी ग्राह्य धरण्यात येणार असून, त्यावर आधारित निश्चित करण्यात आलेल्या योजनेच्या तरतुदीनुसार नुकसानभरपाई देण्यात येणार आहे, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे कळविले आहे.

Web Title: nashik,pmegranate,chiku,lemon,fruit,crop,insurance,scheme,in,the,district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.