परिमंडळात १० हजार ग्राहकांकडून गो-ग्रीनला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 04:18 PM2020-03-17T16:18:19+5:302020-03-17T16:21:08+5:30

नाशिक : वीजिबलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या गो-ग्रीन या पर्यावरणपुरक योजनेत आतापर्यंत एक लाखांपेक्षा अधिक पर्यावरणस्नेही ...

nashik,Go-Green's,response,to,over,customers,in,the,circle | परिमंडळात १० हजार ग्राहकांकडून गो-ग्रीनला प्रतिसाद

परिमंडळात १० हजार ग्राहकांकडून गो-ग्रीनला प्रतिसाद

Next

नाशिक: वीजिबलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या गो-ग्रीन या पर्यावरणपुरक योजनेत आतापर्यंत एक लाखांपेक्षा अधिक पर्यावरणस्नेही ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये कोकण प्रादेशिक विभागात सर्वाधिक ३७ हजार ८०० ग्राहक असून यामध्ये नाशिक परिमंडळातील १० हजार ५८३ वीजग्राहकांचा समावेश आहे.
महावितरणकडून गो-ग्रीन योजनेत छापील वीजिबलाच्या कागदाऐवजी फक्त ई-मेल चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात १० रु पये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांची वार्षिक १२० रु पयांची बचत होणार आहे. याशिवाय वीजिबल ई-मेल तसेच एसएमएस द्वारे दरमहा मिळणार असल्याने ते लगेचच प्रॉम्ट पेमेंटसह आॅनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध होत आहे. तसेच वीजग्राहकांना छापील वीजिबलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजिबल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवण्याची सोय आहे. यासोबतच महावितरणच्या संकेतस्थळावर वीजिबल मूळ स्वरु पात उपलब्ध असून ते डाऊनलोड किंवा प्रिंट करण्याची सोय आहे.
महावितरणमध्ये आतापर्यंत १ लाख ३ हजार ९१८ वीजग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागातील ४०.०६९ ग्राहकांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. त्यानंतर कोकण प्रादेशिक ङ्क्त ३७,८०० नागपूर प्रादेशिक ङ्क्त१३.७१७ आण िऔरंगाबाद प्रादेशिक विभागातील १२,३३२ वीजग्राहकांचा समावेश आहे. परिमंडलिनहाय पर्यावरणस्नेही ग्राहकांची संख्या पुढीलप्रमाणे: पुणे परिमंडल- २४,९७५, नाशिक- १०,५८३ बारामती- ८,३३० कोल्हापूर- ६,७६४ नागपूर- ४,२४९ गोंदिया- १,२८८ चंद्रपूर- १,४१४ अमरावती- २,९२७ अकोला- ३,८३९, कोकण- २,१६१, कल्याण- १०,१३२ जळगाव- ५,३९४ भांडूप- ९,५३० औरंगाबाद- ५,३१० लातूर- ४,०३५ आणि नांदेड परिमंडलात २,९८७ वीजग्राहकांनी वीजिबलासाठी छापील कागदाऐवजी ई-मेल व एसएमएस ला पसंती दिली आहे व पर्यावरणपुरक कामात योगदान दिले आहे.
 

Web Title: nashik,Go-Green's,response,to,over,customers,in,the,circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.