Nashikars were fascinated by ancient weapons | प्राचीन शस्त्रांची नाशिककरांना पडली भुरळ
प्राचीन शस्त्रांची नाशिककरांना पडली भुरळ

ठळक मुद्देसरकारवाडा : वारसा सप्ताह प्रदर्शन

नाशिक : प्राचीन काळात झालेल्या युद्धांत वापरलेल्या तलवारी, कट्यार, खंजीर, भाला, गुप्ती, ढालींसारखे लक्षवेधी शस्त्रे आणि पुरातन शिल्प व नाण्यांनी नाशिककरांना भुरळ घातली. निमित्त होते, जागतिक वारसा सप्ताहच्या औचित्यावर सरकारवाड्यात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे.
पेशवेकाळाची साक्ष देणाऱ्या सराफबाजारातील सरकारवाड्याच्या वास्तूत जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जात आहे. यानिमित्ताने प्रादेशिक वस्तू संग्रहालय व भारतीय सांस्कृतिक निधी नाशिक आणि नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शस्त्र, शिल्प, नाण्यांचे प्रदर्शन मंगळवारपासून (दि.१९) सुरू करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन आठवडाभर नागरिकांसाठी पूर्णपणे खुले असल्याचे अभिरक्षक डॉ. विराग सोनटक्के यांनी सांगितले. या प्रदर्शनात विविध प्रकारची शस्त्रास्त्रांसह पाषाण शिल्प, नाणी, रंगचित्र, छायाचित्रांचा समावेश आहे. तसेच नाशिक परिसरात आढळणारी दुर्मिळ शिल्पे, लाकडी शिल्प, नाणी, उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तूदेखील प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. हे वैविध्यपूर्ण प्रदर्शन पाहण्यासाठी शहरातील नागरिकांसह विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी गर्दी केलयाचे दिसून आले.

Web Title: Nashikars were fascinated by ancient weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.