आदिवासी आश्रमशाळा रोजंदारी कर्मचारी पुन्हा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 07:28 PM2019-09-06T19:28:24+5:302019-09-06T19:30:54+5:30

नाशिक : आदिवासी आश्रमशाळेतील रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना कोणताही धक्का लागणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतरही वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचाºयांच्या जागांवर ...

nashik,adivasi,ashram,school,daily,staff,again,aggressive | आदिवासी आश्रमशाळा रोजंदारी कर्मचारी पुन्हा आक्रमक

आदिवासी आश्रमशाळा रोजंदारी कर्मचारी पुन्हा आक्रमक

googlenewsNext

नाशिक : आदिवासी आश्रमशाळेतील रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना कोणताही धक्का लागणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतरही वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचाºयांच्या जागांवर नोकरभरती करण्यात आल्याने रोजंदारी कर्मचारी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले असून, आदिवासी आयुक्तालयासमोर त्यांनी ठिय्या दिला आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्यांबरोबर अधिकारी चर्चा करीत असून, सायंकाळपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नव्हता.
आदिवासी विकास विभागाच्या नोकरीत रोजंदारी कर्मचाºयांना कायम करण्यात यावे आणि नंतरच भरतीसाठीची परीक्षा घेतली जावी, यासाठी गेल्या फेब्रुवारी महिन्यात बिºहाड आंदोलन करण्यात आले होते. गमिनी काव्याने दि. १६ फेबु्रवारी रोजी नाशिकमध्ये पोहोचलेल्या आंदोलकांनी परीक्षा उधळून लावली होती. यावेळी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की आदिवासी विकास विभागावर आली होती. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना मुंबईला बोलावून घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आश्रमशाळांमधील रोजंदारीवरील कर्मचाºयांच्या नोकरीला कोणताही धोका नसून, त्यांच्या नोकरीला सुरक्षितता प्रदान केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
परंतु आदिवासी विभागाने पुन्हा एकदा नोकरभरती सुरू केली असून, रोजंदारीवरील स्वयंपाकी आणि स्वच्छता कर्मचाºयांच्या जागांवर भरती केल्याने राज्यातील हजारो कर्मचाºयांच्या नोकºया धोक्यात आल्या आहेत. आदिवासी विभागाने फसवणूक केल्याचा आरोप करीत कर्मचारी आक्रमक झाले असून, त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. सकाळी नाशिकमध्ये पोहोचलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, शिष्टमंडळ आदिवासी विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा करीत आहे. सायंकाळपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नव्हता.

Web Title: nashik,adivasi,ashram,school,daily,staff,again,aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.