आपत्कालीन मदतीसाठी नाशिक पोलिस आयुक्तालयाचा मदत कक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 02:44 PM2020-03-24T14:44:07+5:302020-03-24T14:44:27+5:30

नागरिकांच्या मदतीसाठी विविध उपाययोजना

Nashik Police Commissioner's Help Room for emergency help | आपत्कालीन मदतीसाठी नाशिक पोलिस आयुक्तालयाचा मदत कक्ष 

आपत्कालीन मदतीसाठी नाशिक पोलिस आयुक्तालयाचा मदत कक्ष 

Next

नाशिक - शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत सोमवारपासून दि. 23/03/2020 रोजी   crpc 144(1)(3) प्रमाणे वाहन वापरास व वाहतुकीस मनाई आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवास व वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

त्याप्रमाणे सदर आदेशानुसार पोलीस, आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापन यांचेशी निगडित आस्थापनामध्ये कामकाज करणारे अधिकारी कर्मचारी यांना या आदेशातुन त्यांच्या कर्तव्यार्थ प्रवास करण्यास परवानगी देणे आवश्यक असल्याचे नमूद आहे. 

तरी जीवनावश्यक आणि इत्यादी आवश्यक सेवा यांना नाशिक शहरात कर्तव्य बजावताना त्रास होऊ नये, यासाठी मदत कक्ष तयार केला आहे. यात नियंत्रण कक्ष - 100 सह 02532305233/34, 0253231823,

पोलीस निरिक्षक सिताराम कोल्हे 9823788077, सपोनि - रघुनाथ शेगर 9921216577, सपोनि दिपक गिरमे 8652224140, सपोनि समाधान वाघ 8888805100
या अधिकाऱ्यांची  नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून आपल्या समस्या अडचणी सांगून त्याबाबत कळवावे जेणेकरून आपल्या समस्येवर उपाययोजना करता येईल असे आवाहन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

Web Title: Nashik Police Commissioner's Help Room for emergency help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.