राज्यात नाशिक सर्वाधिक थंड; पारा ९.२ अंशावर घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:56 PM2021-02-08T16:56:26+5:302021-02-08T16:59:10+5:30

मागील वर्षी १७ जानेवारी २०२० साली किमान तापमानाचा पारा थेट ६ अंशांपर्यंत खाली घसरला होता. यावर्षी मात्र १० अंशांपेक्षा तापमान अद्याप खाली आलेले नाही. रविवारी या वर्षातील सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे यावर्षी गतवर्षाच्या तुलनेत थंडीचा प्रकोप तसा बघितला तर कमीच असल्याचे दिसून येते.

Nashik the coldest in the state; Mercury dropped to 9.2 degrees | राज्यात नाशिक सर्वाधिक थंड; पारा ९.२ अंशावर घसरला

राज्यात नाशिक सर्वाधिक थंड; पारा ९.२ अंशावर घसरला

Next
ठळक मुद्देनाशिककर गारठले...मागील वर्षाच्या तुलनेत थंडी कमीचदोन दिवसांपासून नाशिक राज्यात अव्वल

नाशिक : शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका मागील दोन दिवसांपासून अचानकपणे वाढला असून नाशिककर गारठले आहे. सोमवारी (दि.८)शहराचे किमान तापमान थेट ९.२अंशावर घसरले तर निफाडमध्ये पारा ६अंशापर्यंत खली आला. या दोन्ही नोेंदी या हंगामातील नीचांकी ठरल्या. रविवारी १० अंशांपर्यंत तापमान घसरले होते. यामुळे नागरिकांना हुडहुडी जाणवत होती; मात्र सोमवारी पारा अधिकच घसरल्याने दिवसभर नागरिकांना गारवा जाणवला.

शहरात मागील काही दिवसांपासून किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. प्रजासत्ताक दिनापासून किमान तापमानात सातत्याने घट होत असून पारा चढ-उतार होत आहे. फेब्रुवारी उजाडल्यापासून किमान तापमान ११ ते १३ अंशाच्या जवळपास स्थिरावत होते; मात्र या दोन दिवसांत किमान तापमानासह कमाल तापमानासुध्दा वेगाने घसरण झाल्याने नाशिककरच चांगलेच गारठले. शनिवारी संध्याकाळपासून नागरिकांना थंडीचा कडाका अनुभवयास येत आहे. रविवारी पहाटेही थंडीचा कडाका होत; मात्र सोमवारी यामध्ये अधिकच वाढ झाल्याचे जाणवले. सुर्योदयानंतरही वातावरणात गारठा कायम राहिला. दिवसभर शहरात वाऱ्याचा वेग अधिक राहिल्याने गारवा जाणवत होता. त्यामुळे नाशिककरांनी या हंगामात प्रथमच दिवसभर ऊबदार कपडे परिधान करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसुन आले. घरे, कार्यालयांमध्ये पंखे पुर्णपणे बंदच होते.
शनिवारी रात्री नऊ वाजेपासूनच शहर व परिसरात थंड वारे वेगाने वाहत आहेत. यामुळे नाशिककरांना शनिवारी रात्रीपासूनच थंडीचा कडाका जाणवत आहे. पुढील काही दिवस नागरिकांना थंडीच्या तीव्रतेचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. शहरात दिवसा तसेच रात्रीही आकाश पुर्णत: निरभ्र राहत असल्याने पारा वेगाने घसरण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यात ही शहरे गारठली

नाशिक @ ९.२
निफाड @६.०

नागपुर @९.४
मालेगाव @९.६

पुणे @९.६
जळगाव @१०.२

ब्रह्मपुरी @१०.३
गोंदिया @१०.५

 

Web Title: Nashik the coldest in the state; Mercury dropped to 9.2 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.