नरहरी झिरवाळ रात्रभर जिल्हा परिषदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 01:24 AM2019-09-18T01:24:31+5:302019-09-18T01:24:50+5:30

आचारसंहिता लागण्यापूर्वी दिंडोरी मतदारासंघातील कामाच्या फाईल्स पाहाण्यासाठी जिल्हा परिषदेत गेलेले आमदार नरहरी झिरवाळ यांच्या कामाच्या फाईल्स वित्त विभागातून गायब झाल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्याने संतप्त झालेले झिरवाळ यांनी फाईल सापडत नाही तो पर्यंंत जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले.

Narahari Zirwal overnight in Zilla Parishad | नरहरी झिरवाळ रात्रभर जिल्हा परिषदेत

नरहरी झिरवाळ रात्रभर जिल्हा परिषदेत

Next
ठळक मुद्देफाईल गहाळ झाल्याचे सांगून अधिकारी निसटले

नाशिक : आचारसंहिता लागण्यापूर्वी दिंडोरी मतदारासंघातील कामाच्या फाईल्स पाहाण्यासाठी जिल्हा परिषदेत गेलेले आमदार नरहरी झिरवाळ यांच्या कामाच्या फाईल्स वित्त विभागातून गायब झाल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्याने संतप्त झालेले झिरवाळ यांनी फाईल सापडत नाही तो पर्यंंत जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले. विशेष म्हणजे झिरवाळ हे रात्रभर जिल्हा परिषदेतच थांबून असतांना अधिकारी, कर्मचारी मात्र कार्यालये बंद करून निघून गेले.
दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील सिंमेंट बंधारे तसेच पाणीपुरवठ्या योजनांच्या कामांबाबत आमदार झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडे सोमवारी फाईल्सची मागणी केली होती. त्यावेळी त्यांना चुकीची माहिती सांगण्यात आली. सदर बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते मंगळवारी पुन्हा जिल्हा परिषदेत गेले असता तेथील अधिकाऱ्यांनी भलतीच माहिती सांगून त्यांची दिशाभूल केली.
सकाळी ११.३० वाजता जिल्हा परिषदेत आलेले झिरवाळ यांची सायंकाळी ७.३० वाजता मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी भेट झाली तेंव्हा त्यांनी सदरील प्रकार त्यांच्याकडे मांडला. यावेळी त्यांनी वित्त विभागाला फाईल्स झिरवाळ यांना दाखविण्याचेही सांगितले. त्यावेळी वित्त अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांनी काही वेळाने झिरवाळ यांना भेटून फाईल सापडत नसल्याचे कारण सांगून कार्यालय बंद करून घेतले. अधिकारी दाद देत नसल्याचे पाहून झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेतच ठिय्या दिला.


यावेळी संतप्त झालेल्या झिरवाळ यांनी वित्त विभागाकडे प्रत्यक्ष कामांची फाईल्सची मागणी केली. पाणीपुरवठ्याच्या १४ कामांपैकी तीन कामे एका ठेकेदारालाआणि ११ कामे एकाच ठेकेदाराला कसे दिले आणि त्याच्या पुर्वीच्या कामाचा दर्जाच्या तक्रारी असतांना त्याने कामे कशी केली याची माहिती विचारली असता त्यांना कुणीही उत्तरे दिली नाहीत.
याबाबतची तक्रार त्यांनी मु्ख्यमंत्री, पालकमंत्री तसेच विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली आहे.
 

Web Title: Narahari Zirwal overnight in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.