विवाहितेवर अत्याचार करणारा नराधम जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:07 AM2021-08-02T04:07:00+5:302021-08-02T04:07:00+5:30

इगतपुरी : तालुक्यातील तळेगाव शिवारातील विनोद देसले यांचे व्हिंटेज व्हॅली नावाच्या बिल्डिंगचे साइटवर पत्र्याच्या शेडमध्ये पंचवीस वर्षाच्या विवाहितेवर ...

Naradham jailed for abusing a married woman | विवाहितेवर अत्याचार करणारा नराधम जेरबंद

विवाहितेवर अत्याचार करणारा नराधम जेरबंद

googlenewsNext

इगतपुरी : तालुक्यातील तळेगाव शिवारातील विनोद देसले यांचे व्हिंटेज व्हॅली नावाच्या बिल्डिंगचे साइटवर पत्र्याच्या शेडमध्ये पंचवीस वर्षाच्या विवाहितेवर हेमंत नागेश शिरोरे (४६, रा. अक्षर व्हिला, रो हाऊस नंबर ९, कलानगर, दिंडोरी रोड, नाशिक) या नराधमाने सदर महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २९ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास हेमंत नागेश शिरोरे याने फिर्यादी महिला राहत असलेल्या पत्र्याच्या शेडमधील घरात येऊन शरीरसुखाची मागणी केली अन्यथा तुझ्या मुलाला जिवंत मारून टाकीन, असा दम देऊन फिर्यादीवर जबरदस्तीने अत्याचार केला. यातील फिर्यादी यांनी त्यांचे पती बाहेरून आल्यानंतर त्यांना घडलेली हकीकत सांगितल्यानंतर तिने पतीसमवेत इगतपुरी पोलीस स्टेशन गाठले. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिल्यावर सदर आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीला पोलीसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Web Title: Naradham jailed for abusing a married woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.