नांदगावी वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 01:16 PM2019-09-16T13:16:00+5:302019-09-16T13:16:13+5:30

नांदगांव : शहरातील वाहतूक म्हणजे सततची दगदग झाली आहे. वाहतूक कोंडीने शहरातील नागरिकांचीच कोंडी केली आहे.

Nandgavi traffic congestion | नांदगावी वाहतुकीची कोंडी

नांदगावी वाहतुकीची कोंडी

Next

नांदगांव : शहरातील वाहतूक म्हणजे सततची दगदग झाली आहे. वाहतूक कोंडीने शहरातील नागरिकांचीच कोंडी केली आहे. पोलीस किंवा प्रशासनाने यावर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील रेल्वे फाटकातुन बाजार समितीकडे जाणारा एकमेव मार्ग आहे. यापूर्वी लेंडी नदीच्या रेल्वे पुलाखालून दुचाकी व छोटी वाहने जात असत. मात्र रेल्वे प्रशासनाने तो मार्ग बंद केल्याने त्याचा ताण मुख्य रेल्वे फाटकावर पडतो आहे. रेल्वे फाटकातुन तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रु ग्णालय, बाजार समिती, आनंदवाडी, स्वामी विवेकानंद नगर, एस टी काँलनी, मल्हारवाडी आणी येवला रोड या भागाकडे जाण्या साठी रेल्वेफाटक हा एकमेव मार्ग आहे . फाटकात दिवसातून अनेकदा रहदारी ठप्प होत असते. त्याचा परिणाम शाळकरी मुले, पादचारी व इतर प्रवाशाना सोसावा लागतो आहे. फाटकातील गर्दीतून जातांना प्रवासी व शाळकरी मुलांना जातांना जीवमुठीत धरु न चालावे लागते. या क्रॉसिंगवर अनेकदा भरधाव वेगाने येणार्या रेल्वेचा धक्का लागून अपघातात लोक मृत्युमुखी पडले आहेत. फाटकाच्या दोन्ही बाजूला झालेली अतिक्र मणे रहदारीच्या कोंडीत भर घालतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूने टपर्या ,हातगाडे , फेरीवाले यांची भर पडते यावर आता प्रशासनाने उपाय करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तसेच शहरातील भाजी बाजारात देखील नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. येथे तर दोन्हीबाजुला हातगाडे लावलेले असतात. त्यामुळे पुढे जाण्यास वाहनांना रस्ताच मोकळा राहत नाही. भाजी विक्र ते भर रस्त्यावर बसून असतात. दोन्ही बाजूला दुकाने लावलेली असतात वाहन धारकांना तर सर्कस करावी लागते.

Web Title: Nandgavi traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक