आफ्रिकन मुस्लीम कलाकारांकडून ईदगाह मैदानावर नमाजपठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 09:19 PM2018-08-23T21:19:07+5:302018-08-23T21:20:42+5:30

Namaz Pathan from Idaho grounds by African Muslim artists | आफ्रिकन मुस्लीम कलाकारांकडून ईदगाह मैदानावर नमाजपठण

आफ्रिकन मुस्लीम कलाकारांकडून ईदगाह मैदानावर नमाजपठण

googlenewsNext
ठळक मुद्दे पारंपरिक पोशाखात हजेरी लावून नमाज अदा केली.कलाकारांसमवेत ‘सेल्फी’ घेण्यासाठी स्थानिक युवकांची गर्दी

नाशिक : बकरी ईदचा सण नुकताच शहरासह सर्वत्र साजरा झाला. शहरातील ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर पार पडलेल्या सामुहिक नमाजपठणाच्या सोहळ्याचे आगळे वैशिष्टय म्हणजे या सोहळ्यात सहा आफ्रिकन मुस्लीम कलावंतांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
बुधवारी (दि.२२) ईदगाह मैदानावर नमाजपठणाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेकडो मुस्लीम बांधव उपस्थित होते. दरम्यान, शहरातील गंगापूररोड परिसरात एक सर्कसचे दैनंदिन खेळ सुरू आहे. या सर्कसमध्ये बहुतांश विदेशी कलावंतांचा सहभाग आहे. सर्कसमधील काही आफ्रिकन मुस्लीम कलाकारांनी ईदगाह मैदानावरील नमाजपठणाच्या सोहळ्याला पारंपरिक पोशाखात हजेरी लावून नमाज अदा केली. त्यांच्या सहा युवा कलावंतांचा गु्रपने लक्ष वेधून घेतले. या मुस्लीम आफ्रिकन कलाकारांसमवेत ‘सेल्फी’ घेण्यासाठी स्थानिक युवकांची गर्दी झाली होती. बहुतांश युवकांनी त्यांच्याशी हस्तांदोलन, गळाभेट घेत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: Namaz Pathan from Idaho grounds by African Muslim artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.