आरक्षणासाठी ओबीसी संघटनांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 02:47 PM2021-06-17T14:47:00+5:302021-06-17T14:49:03+5:30

रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच द्वारका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीसांची वाहने चारही बाजुंनी उभी करण्यात आली होती. घोषणाबाजी करीत कार्यकर्ते चौकात दाखल झाल्यानंतर अचानक ठिय्या आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरच कार्यकर्ते बसल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

nahsik,block,the,way,of,OBC,organizations,for,reservation | आरक्षणासाठी ओबीसी संघटनांचा रास्ता रोको

आरक्षणासाठी ओबीसी संघटनांचा रास्ता रोको

Next
ठळक मुद्दे निषेधाचे फलक देखील यावेळी झळकविण्यात आले. काळे कपडे परिधान करून काही कार्यकर्ते आंदोलनात सहभागी


ओबीसी आरक्षण: द्वारका चौकात आंदोलकांना घेतले ताब्यातनाशिक: ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द ठरविण्यात आल्यानंतर आक्रामक झालेल्या ओबीसी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन केले. सकाळ पासून चौकात वाहतूक कोंडी झालेली असतांनाच

आरक्षण बचावासाठी तीव्र घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी संघटांनसह समता परिषदेने राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार नाशिकमध्ये द्वारका चौकात ओबीसी संघटनांसह समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आरक्षण बचासाठी आक्रोश आंदोलन केले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. ह्यनिषेधह्ण अशा आशयाचे काळे कपडे परिधान करून काही कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. निषेधाचे फलक देखील यावेळी झळकविण्यात आले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. महात्मा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा केलेले कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच द्वारका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीसांची वाहने चारही बाजुंनी उभी करण्यात आली होती. घोषणाबाजी करीत कार्यकर्ते चौकात दाखल झाल्यानंतर अचानक ठिय्या आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरच कार्यकर्ते बसल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आंदोलनात समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, संतोष डोमे, समाधान जेजूरकर, अंबादास खैरे, पांडुरंग काकड, कविता कर्डक, नगरसेवक समीना मेमन आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: nahsik,block,the,way,of,OBC,organizations,for,reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.