A murder victim's betrothed by a step-son | सावत्र मुलाने दिली खुनाची सुपारी

मालेगाव संविधाननगर गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपींसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, हवालदार वसंत महाले, रतीलाल वाघ, राकेश उबाळे, सचिन संवत्सरकर, हरीष आव्हाड, फिरोज पठाण आदी.

ठळक मुद्देमालेगाव । संविधाननगर गोळीबारप्रकरणी सात जणांना अटक

मालेगाव : भायगाव शिवारातील संविधाननगर भागात राहणाऱ्या ज्योती भटू डोंगरे यांची गोळ्या झाडून हत्या करणाºया सात संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व वडनेर खाकुर्डी पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या जाचाला कंटाळून सावत्र मुलानेच मित्रांच्या मदतीने खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
संविधाननगरमध्ये १६ जानेवारीला दिवसाढवळ्या अज्ञात दोघा इसमांनी ज्योती डोंगरे हिच्यावर दोन गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेमुळे परिसरात भतिीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीसप्रमुख आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व वडनेर खाकुर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती. याप्रकरणी पोलिसांनी मनोजसह प्रकाश भिला निकम ऊर्फ पका (३४, रा. साने गुुरूजीनगर), जितेंद्र बाबूराव कास ऊर्फ जितू राजपूत (४०, रा. मुक्ताई कॉलनी), रवींद्र दादाजी अहिरे (२७, रा. इंदिरानगर, चंदनपुरी), रवि रमेश पावरा (३०, रा. पंचरंगा कॉलनी, धुळे), संजय सरदार पावरा (४०, रा. आंबे, ता. शिरपूर), सागर अनिल रंगारी (२७, रा. मोतीबाग नाका) या सात जणांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. पी. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संदीप गुनगहू, सागर शिंपी, हवालदार वसंत महाले, सुनील अहिरे, राकेश उबाळे, चेतन संवत्सरकर, हरिष आव्हाड, रतीलाल वाघ, फिरोज पठाण, प्रदीप बहिरम, संदीप लगड यांच्यासह वडनेर खाकुर्डीचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे व वडनेर पोलिसांनी केली आहे.

मित्रांच्या मदतीने खून
ज्योती डोंगरे यांचा सावत्र मुलगा मनोज भटू डोंगरे याला पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर मयत ज्योती डोंगरे ही वडील भटू देवरे व कुटुंबीयांना मानसिक त्रास देत होती. तिच्या त्रासाला कंटाळून मित्रांच्या मदतीने खून केल्याची कबुली त्याने दिली.
 

Web Title: A murder victim's betrothed by a step-son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.