महापालिकेच्या जप्त गाळ्यांचा लिलाव होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 10:56 PM2020-08-13T22:56:26+5:302020-08-13T23:51:10+5:30

नाशिक : गाळे जप्त केल्यानंतर देखील त्याची थकबाकी न भरणाऱ्या व्यवसायिकांना महापालिकेच्या वतीने दणका देण्यात येणार असून या जप्त गाळ्यांचे लिलाव करण्यात येणार आहे.

Municipal Corporation's confiscated cheeks will be auctioned | महापालिकेच्या जप्त गाळ्यांचा लिलाव होणार

महापालिकेच्या जप्त गाळ्यांचा लिलाव होणार

Next
ठळक मुद्देमहापालिकेच्या गाळ्यांचे वाढलेल्या दरामुळे लिलावास किती प्रतिसाद मिळतो याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गाळे जप्त केल्यानंतर देखील त्याची थकबाकी न भरणाऱ्या व्यवसायिकांना महापालिकेच्या वतीने दणका देण्यात येणार असून या जप्त गाळ्यांचे लिलाव करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने विविध भागात व्यापारी संकुले आणि खोका मार्केट असून सुमारे एक हजार गाळे आहेत. त्यातील सुमारे ३५ गाळे तीन वर्षांपूर्वी थकबाकीमुळे सील करण्यात आले आहेत. हे सर्व गाळे सील करण्यात आले असून त्यामुळे थकबाकीदार गाळे धारक त्यांची रक्कम जमा करतील अशी अपेक्षा प्रशासनाला होती. मात्र, गाळे धारकांनी त्यानंतर देखील महपालिकेशी संपर्क साधला नाही की, थकबाकी भरली नाही. त्यामुळे आता या गाळेधारकांना वठणीवर आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने जप्त गाळ्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.
अर्थात, महापालिकेने २०१२ पासून गाळ्यांचे रेडीरेकनरच्या आधारे दर निश्चित केले आहेत. त्यामुळे दरवाढ आणि थकबाकीची रक्कम ही अत्यंत आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळेच दरवाढीच्या विरोधात काही व्यवसायिकांनी उच्च न्यायालयात दाद देखील मागितली आहे.
प्रशासनाने मात्र आता उत्पन्नवाढीसाठी थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाईचा बडगा उगारला असला तरी महापालिकेच्या गाळ्यांचे वाढलेल्या दरामुळे लिलावास किती प्रतिसाद मिळतो याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

Web Title: Municipal Corporation's confiscated cheeks will be auctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.