मुंगसरे रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:17 AM2019-10-31T00:17:32+5:302019-10-31T00:19:56+5:30

मुंगसरे-चांदशी दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्याने नागरिकांना पाठीचे व मणक्यांचे, मानेचे आजार जडले आहेत. या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी ठेकेदाराने थातूरमातूर खड्डे बुजवले होते, परंतु महिना होत नाही तोच खड्डे पूर्ण मोकळे झाले

 Mungsare Road Maintenance | मुंगसरे रस्त्याची दुरवस्था

मुंगसरे रस्त्याची दुरवस्था

Next

मातोरी : मुंगसरे-चांदशी दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्याने नागरिकांना पाठीचे व मणक्यांचे, मानेचे आजार जडले आहेत. या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी ठेकेदाराने थातूरमातूर खड्डे बुजवले होते, परंतु महिना होत नाही तोच खड्डे पूर्ण मोकळे झाले असून, वाहनचालकांना व स्थानिक शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. याविषयी रस्त्याची दुरु स्ती न झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
मुंगसरा, दरी, यशवंतनगर व इतर भागांतील नागरिकांना नाशिक शहराशी दळणवळण करणारा मध्यवर्ती व जवळचा असा महत्त्वाचा रस्ता आहे. या गावातील मजूर वर्ग कामाच्या निमित्ताने तसेच शालेय विद्यार्थी व इतर व्यावसायिक वर्ग याच रस्त्याचा वापर करत आहेत. यासाठी गावातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा अनेक शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत, असे असूनही या शेतकरी वर्गाच्या पदरी निराशा आली आहे. रस्त्यात पडलेली मोठमोठे खड्डे यामुळे वयोवृद्ध तसेच तरु ण वर्गालाही मानेच्या व मणक्याच्या आजाराने ग्रासले आहे. त्यात आता शेतकरी वर्गाचा टमाटा व इतर मालाचा सुरू होणार असल्याने या रस्त्यात येणारी जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, त्यामुळे शेतकºयांना या मार्गाशिवाय कुठलाही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. या परिसरातील गारेवाडीला त्याचा फटका बसत आहे.
रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे सोडाच पायी चालणे मुश्किल झाले आहे. शासनाच्या दरबारी कागदोपत्री रस्ता तयार झालेला आहे त्याला उलटून चार वर्षे झालीत, पण हा रस्ता काही दुरु स्त होण्याचे नाव घेत नाही निवडणुकी आधी दर्शनी भागातील पन्नास-शंभर फुटाचे रस्ते अवघ्या दोन-तीन दिवसांत तयार झाले. या रस्त्याकडे दुर्लक्ष का?
- गोरख म्हैसधुणे, स्थानिक शेतकरी

Web Title:  Mungsare Road Maintenance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.