ऊसशेती जळीत घटनेस महावितरण कंपनी जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 09:18 PM2020-11-21T21:18:42+5:302020-11-22T01:47:09+5:30

डांगसौंदाणे : महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथील दोन शेतकऱ्यांचा एकूण नऊ एकर ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेस महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा ठपका विद्युत निरीक्षण कार्यालयाकडून करण्यात आलेल्या चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता या चौकशी अहवालाच्या आधारावर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रतीक्षा आहे.

MSEDCL is responsible for the burning of sugarcane | ऊसशेती जळीत घटनेस महावितरण कंपनी जबाबदार

ऊसशेती जळीत घटनेस महावितरण कंपनी जबाबदार

Next
ठळक मुद्देघटनेतील जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.

डांगसौंदाणे : महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथील दोन शेतकऱ्यांचा एकूण नऊ एकर ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेस महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा ठपका विद्युत निरीक्षण कार्यालयाकडून करण्यात आलेल्या चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता या चौकशी अहवालाच्या आधारावर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रतीक्षा आहे.
बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथील शेतकरी दिगंबर धर्मा बोरसे यांचा सात एकर ऊस आणि ठिबक सिंचन, तर वंदना साहेबराव काकुळते यांचा दोन एकर ऊस बुधवारी (दि,४) शॉटसर्किटमुळे जळून खाक झाला होता. त्यात या दोन्ही शेतकऱ्यांचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या जळीत उसाचा पंचनामा करून विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली. चौकशी अहवाल महावितरण कंपनीला सादर करण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारावर आता घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.

२०१८ पासून नुकसानग्रस्त शेतकरी शेतातील कामासंदर्भात महावितरण कंपनीच्या डांगसौंदाणे कार्यालयाशी पाठपुरावा करत होते, मात्र महावितरण कंपनीच्या स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही घटना घडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. घटनेला महिना होत आला आहे, मात्र अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.
दरम्यान,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी यापूर्वी सांगितले आहे. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.

माझ्याकडे अद्याप विद्युत निरीक्षक कार्यालयाचा अहवाल प्राप्त झालेला नाही, मात्र चौकशी अहवाल आल्यानंतर घटनेच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, शिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
- रमेश सानप, अधीक्षक इंजिनिअर, महावितरण कंपनी, मालेगाव

माझ्या शेतातील ऊस जळीत घटनेस महावितरण जबाबदार आहे, त्यामुळे महावितरण कंपनीने लवकरात लवकर मला झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई द्यावी.
- दिगंबर बोरसे, नुकसानग्रस्त शेतकरी. 

Web Title: MSEDCL is responsible for the burning of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.