संगणक परिचालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 06:16 PM2019-08-20T18:16:20+5:302019-08-20T18:16:44+5:30

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातील ग्रामपंचायतस्तरावर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या संगणक परिचालकांनी प्रत्येक महिन्याच्या एक निश्चित तारखेला मानधन मिळावे आणि महाराष्ट्र शासनाच्या आयटी विभागाकडून नेमणूक होणेकामी व इतर मागण्यांसंदर्भात कामबंद आंदोलन छेडले आहे.

Movement of computer operators | संगणक परिचालकांचे आंदोलन

संगणक परिचालकांचे आंदोलन

Next
ठळक मुद्देतीव्र असंतोष : डिजिटल इंडियाचा पायाच कोलमडणार

खेडलेझुंगे : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातील ग्रामपंचायतस्तरावर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या संगणक परिचालकांनी प्रत्येक महिन्याच्या एक निश्चित तारखेला मानधन मिळावे आणि महाराष्ट्र शासनाच्या आयटी विभागाकडून नेमणूक होणेकामी व इतर मागण्यांसंदर्भात कामबंद आंदोलन छेडले आहे.
शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगणक परिचालकांना दिलेला शब्द मागील ८ म्ािहन्यांपासून पाळला नाही. त्यामुळे राज्यभरातील संगणक परिचाल कांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. सोमवारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सर्व संगणक परिचालकांनी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. सन २०११ पासून संग्राम व सध्या आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत राज्यातील ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्रचे काम करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचा डिजिटल इंडियामध्ये चमकदार कामागिरी दिसून येत आहे. या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एप्रिल २०१९ पासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे संगणक परिचालकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मानधन, कंत्राटी पदे यांसारख्या अनेक समस्यांनी पीडित असलेल्या हजारो संगणक परिचालकांनी १९ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे डिजिटल महाराष्ट्राचे कामकाज ठप्प होणार असून, नागरिकांचे, शेतकरी व विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत.
निफाड तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांना तालुका अध्यक्ष तुषार पानगव्हाण, प्रवीण मोरे, अक्षय सानप, उमर काद्री, महेश कापसे, अंकुश गाढवे, माधुरी खोडे, संध्या केदारे, कल्पना जाधव यांनी निवेदन दिले. जोपर्यंत शासनाकडून महाराष्ट्र आयटी महामंडळात समावेशासह इतर मागण्या मान्य होत नाहीत ता पर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच राहील. या आंदोलनाबरोबर आणखी वेगवेगळे आंदोलने सुरू करण्यात येतील, असे संघटनेकडून सांगण्यात आले.

Web Title: Movement of computer operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.