विजेच्या धक्क्याने सासू-सुनेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 01:01 AM2019-09-30T01:01:45+5:302019-09-30T01:02:01+5:30

नाशिक : येथील उत्तमनगर भागात घराच्या गच्चीवर कपडे वाळत टाकत असताना तारांच्या विद्युतप्रवाहचा झटका लागून सासू-सुनेचा जागीच मृत्यू झाल्याची ...

 Mother-in-law's death by electric shock | विजेच्या धक्क्याने सासू-सुनेचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने सासू-सुनेचा मृत्यू

Next

नाशिक : येथील उत्तमनगर भागात घराच्या गच्चीवर कपडे वाळत टाकत असताना तारांच्या विद्युतप्रवाहचा झटका लागून सासू-सुनेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२९) घडली. या घटनेनंतर रहिवाशांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन केले. के दार कुटुंबाची सून सिंधूबाई केदार (४०) कपडे वाळत टाकत होत्या. त्यावेळी त्यांची सासू सोजाबाई (७५) या बसलेल्या होत्या. अचानक सिंधूबाई यांना वीजवाहिन्यांच्यावीजप्रवाहाचा जोरदार धक्का लागला. सोजाबाई सुनेच्या मदतीला धावल्या असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

Web Title:  Mother-in-law's death by electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.