सासुचे सूनेने तर पतीने पत्नीचे केले औक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 04:34 PM2020-11-18T16:34:23+5:302020-11-18T16:36:56+5:30

नाशिक- दिवाळी म्हंटली की घरोघर लक्ष्मीचे पुजन होते. मात्र, मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने यंदा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत सासूने सुनेचे तर पतीने पत्नीचे औक्षण करून नात्यांचा अनोखा उत्सव यंदा साजरा केला.

The mother-in-law's daughter-in-law and the husband's wife | सासुचे सूनेने तर पतीने पत्नीचे केले औक्षण

सासुचे सूनेने तर पतीने पत्नीचे केले औक्षण

Next
ठळक मुद्देनाते दृढ करणारा उपक्रम जिजाऊ ब्रिगेडने घेतला पुढाकार

नाशिक-दिवाळी म्हंटली की घरोघर लक्ष्मीचे पुजन होते. मात्र, मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने यंदा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत सासूने सुनेचे तर पतीने पत्नीचे औक्षण करून नात्यांचा अनोखा उत्सव यंदा साजरा केला.

सासु सूनचे नाते अधिक घट्ट व्हावे तसचे विज्ञानवादी दृष्टीकोन वाढीव लागावा तसेच महिलांना मानसन्मान मिळावा यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने राज्यभरात हा उपक्रम राबवण्यात आला. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने दरवर्षी लक्ष्मी पुजनाच्या दिवशी जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महाराणी ताराराणी, रमाई आदी पराक्रमी महिलांचे पुजन करऱ्यात येते. याशिवाय घरातील पत्नी, आई, बहीण, मुलगी या देखील लक्ष्मी स्वरूपच आहेत. त्यामुळे घरात अशा लेकी सुनांच्या पुजनाचे आवाहन करण्यात आले होते. त्याला राज्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या विविध शाखांच्या कार्यकर्त्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला.

कुटुंबातील वाद विवाद कमी होऊन स्नेहभाव वाढावा यासाठी सासु सूनांनी एकमेकींचे तर माता पित्यांनी कन्येचे देखील पुजन केले आणि गृहलक्ष्मीला आदराचे स्थान देण्यात आले. ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधूरी भदाणे, जिल्हाध्यक्ष अनुराधा धोंडगे, महानगर प्रमुख चारूशीला देशमुख तसेच वैशाली डुंबरे, निलीमा निकम, मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष के.डी.पाटील, दीपक भदाणे, राजेंद्र निंबाळते, पी.एन. पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमासाठी सक्रीय योगदान दिले.
 

Web Title: The mother-in-law's daughter-in-law and the husband's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.