नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 01:14 AM2019-10-12T01:14:00+5:302019-10-12T01:15:43+5:30

विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम हा मतदारसंघ विविध प्रकारच्या राजकीय नाट्यमय घडामोडींमुळे सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळण्यापासून ते शिवसेनेच्या बंडखोरीसारख्या राजकीय घडामोडी सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत. सेनेची बंडखोरी आणि माघारीनाट्याचा अंकही चांगलाच गाजला. राष्टÑवादीचा पाठिंबा ते अधिकृत उमेदवार अशा नाट्यमय घटनांनीदेखील चर्चेत राहिलेला मतदारसंघ आणखी एका कारणामुळे वेगळा ठरला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदारसंख्या असलेला हा मतदारसंघ असून, येथील मतदारांची संख्या ४ लाख १ हजार ५७७ इतकी आहे.

Most voters in Nashik West | नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक मतदार

नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक मतदार

Next
ठळक मुद्देउमेदवारांची संख्याही सर्वाधिक : दोन बॅलेट युनिटचा होणार वापर

नाशिक : विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम हा मतदारसंघ विविध प्रकारच्या राजकीय नाट्यमय घडामोडींमुळे सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळण्यापासून ते शिवसेनेच्या बंडखोरीसारख्या राजकीय घडामोडी सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत. सेनेची बंडखोरी आणि माघारीनाट्याचा अंकही चांगलाच गाजला. राष्टÑवादीचा पाठिंबा ते अधिकृत उमेदवार अशा नाट्यमय घटनांनीदेखील चर्चेत राहिलेला मतदारसंघ आणखी एका कारणामुळे वेगळा ठरला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदारसंख्या असलेला हा मतदारसंघ असून, येथील मतदारांची संख्या ४ लाख १ हजार ५७७ इतकी आहे.
जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघापैकी नाशिक पश्चिम मतदारसंघात असलेल्या उमेदवारांची संख्यादेखील मोठी असून, मतदारांची संख्या चार लाखांच्या पुढे आहे. जिल्ह्यातील ही सर्वाधिक मतदारसंख्या ठरली आहे. २,१७,७११ पुरुष आणि १,८३,८६६ महिला मतदारांची संख्या आहे. पुरुष मतदारांची संख्या मोठी आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले असून, शहरातील नाशिक पश्चिम या मतदारसंघात १९ उमेदवार असल्याने या मतदारसंघात दोन बॅलेट युनिटवर मतदान घ्यावे लागणार आहे.
एखाद्या मतदारसंघात पंधरांपेक्षा अधिक उमेदवार राहिल्यास अशा ठिकाणी दोन बॅलेट युनिटचा वापर करावा लागतो.
नाशिक पूर्व मतदारसंघातील मतदारसंख्या ३ लाख ५५ हजार इतकी आहे. त्यामुळे हा मतदारसंघ पश्चिमनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे शहरातील हे दोन्ही मतदारसंघ अन्य मतदारसंघांच्या तुलनेत पहिल्या आणि दुसºया क्रमांकावरचे ठरले आहेत.
मतदारसंघनिहाय मतदारसंख्या
नांदगाव ३,१५,९९८
४मालेगाव मध्य २,९६,६६७
४मालेगाव बाह्य ३,४०,९११
४बागलाण २,७६,२७२
४कळवण २,६८,५६९
४चांदवड २,७७,९५१
४येवला २,९६,८०८
४सिन्नर ३००५४२
४निफाड २,७१,०५६
४दिंडोरी ३०००२३
नाशिक पूर्व ३,५५,१८८
४नाशिक मध्य ३,१९,४ं६०
४नाशिक पश्चिम ४,०१,५१७
४देवळाली २,६४,१०८
४इगतपुरी २,५९,५११
४एकूण ४५,४४,६४१

सर्वाधिक महिला
मतदार पश्चिममध्येच
मतदारसंघात सर्वाधिक मतदार असल्याने साहजिकच महिला मतदारांची संख्यादेखील येथे मोठी आहे. महिला मतदारांची संख्या १ लाख ८३ हजार ८६६ इतकी आहे, तर पुरुष मतदारांची संख्या २ लाख १७ हजार ७११ इतकी आहे. जिल्ह्यात सर्वात आघाड्यांवर पश्चिमची आकडेवारी मोठी दिसून येते.

Web Title: Most voters in Nashik West

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.