गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला अधिक गती , मूर्तिकारांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 06:49 PM2020-06-19T18:49:21+5:302020-06-19T18:51:03+5:30

देशात नव्हे तर जगभरात अनेक ठिकाणी साजरा केला जातो. परंतु यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट निर्माण झाल्याने तीन महिने मूर्तीकारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण होते. परंतु आता जनजीवन पुन्हा सुरळीत होऊन सर्व दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने मूर्तिकारांच्या आशा पल्लवीत झाल्या असून त्यांनी आपल्या कारागिरीच्या कामाला आता दुप्पट वेगाने सुरुवात केली आहे.

More speed for the work of making Ganesha idols, raising the hopes of sculptors | गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला अधिक गती , मूर्तिकारांच्या आशा पल्लवित

गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला अधिक गती , मूर्तिकारांच्या आशा पल्लवित

Next
ठळक मुद्देकारागिरीच्या कामाला दुप्पट वेगाने सुरुवात दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने मूर्तिकारांच्या आशा पल्लवीत

नाशिक : विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव हा केवळ राज्यात आणि देशात नव्हे तर जगभरात अनेक ठिकाणी साजरा केला जातो. परंतु यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट निर्माण झाल्याने तीन महिने मूर्तीकारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण होते. परंतु आता जनजीवन पुन्हा सुरळीत होऊन सर्व दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने मूर्तिकारांच्या आशा पल्लवीत झाल्या असून त्यांनी आपल्या कारागिरीच्या कामाला आता दुप्पट वेगाने सुरुवात केली आहे.    गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपल्याने गणेश मूर्ती बनवण्याच्या बनवण्याच्या कामाला वेग आला आहे. वास्तविक पाहता दरवर्षी मोठ्या मूर्तिकारांकडे  आठ महीनेआधीच गणेश मूर्ती तयार करून त्यावर कलाकुसर करण्याच्या कामाला सुरुवात होते  . यंदा मात्र कोरानाचे सावट येण्यापूर्वी मूर्तिकारांनी आधी म्हणजे जानेवारी- फेब्रुवारीमध्ये बनवून ठेवलेल्या मूर्तींचे काय करायचे असा प्रश्न सुमारे तीन महिने निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी जवळजवळ नवीन मूर्ती बनविण्याचे काम थांबविले होते. आता मात्र तीन महिन्याच्या लॉकडाऊननंतर उद्योग व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याने आणि जनजीवन देखील पूर्वपदावर येऊ लागल्याने गणेश मूर्तीकारांमध्ये आशावादी दृष्टिकोन निर्माण झाला आहे. किंबहुना गणेश भक्तांकडून दरवर्षीप्रमाणे मूर्तीसाठी आतापासूनच विचारणा होऊ लागल्याने मूर्तीकारांमध्ये कामाचा हुरूप आला आहे . पूर्वीची मरगळ दूर होऊन पुन्हा नव्या जोमाने त्यांनी या कामाला सुरुवात केली आहे. काही मूर्तीकार सुमारे पाच ते सात फूट मूर्ती बनवीत असत . यंदा मात्र दोन ते अडीच फुटाची मूर्ती बनविण्यावर त्यांनी भर दिलेला दिसून येतो. कारण यंदा सार्वजनिक गणेश मंडळदेखील भव्यदिव्य मूर्ती ऐवजी घरगुती गणपतीप्रमाणेच गणेशमूर्ती स्थापन करणार येणार असल्याचे समजते.

Web Title: More speed for the work of making Ganesha idols, raising the hopes of sculptors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.