गटविकास अधिकाऱ्यांनी केली मानोरीतील कामांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:01 PM2019-08-13T23:01:47+5:302019-08-13T23:03:29+5:30

मानोरी : येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांनी तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे मंगळवारी (दि.१३) भेट दिली. यावेळी दलित वस्तीमध्ये नव्याने करण्यात आलेल्या कॉँक्रीट रस्त्याची पाहणी केली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला देखील भेट देऊन वर्ग खोल्यांची पाहणी केली.

Monitoring works by group development officials | गटविकास अधिकाऱ्यांनी केली मानोरीतील कामांची पाहणी

मानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट प्रसंगी येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, विस्तार अधिकारी आहिरे, शिक्षक राजू सानप आदी.

googlenewsNext
ठळक मुद्दे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कोठून होता? याबाबत माहिती घेतली.

मानोरी : येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांनी तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे मंगळवारी (दि.१३) भेट दिली. यावेळी दलित वस्तीमध्ये नव्याने करण्यात आलेल्या कॉँक्रीट रस्त्याची पाहणी केली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला देखील भेट देऊन वर्ग खोल्यांची पाहणी केली.
विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराबद्दल शिक्षकाकडून माहिती जाणून घेतली. तसेच गावात पिण्याच्या पाण्याची सोय कशी आहे? पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कोठून होता? याबाबत माहिती घेतली. यावेळी ३८ गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत गावाला पाणी पुरवठा होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
यावेळी येवला पंचायत समितीचे गटविस्तार अधिकारी आहिरे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राजू सानप, ग्रामपंचायत शिपाई तुकाराम शेळके, अनंता आहेर, संदीप वावधाने, दत्तात्रय साळवे, अमोल शेळके, सुनील साळवे, विकास बोराडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Web Title: Monitoring works by group development officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.