जमावाची बसेसवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:01 PM2020-03-17T23:01:01+5:302020-03-17T23:01:40+5:30

पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरवाडे वणी फाट्याजवळ चांदवडकडे जाणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मंगळवारी (दि. १७) सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने महामार्गावर जाणाºया बसेसवर दगडफेक केली.

The mob rocks on buses | जमावाची बसेसवर दगडफेक

जमावाची बसेसवर दगडफेक

Next
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : शिरवाडे वणी फाट्यानजीक अपघातात दुचाकीस्वार ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरवाडे वणी फाट्याजवळ चांदवडकडे जाणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मंगळवारी (दि. १७) सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने महामार्गावर जाणाºया बसेसवर दगडफेक केली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवाडे वणी येथील संजय भिका डंबाळे हे आपल्या बजाज डिस्कव्हर दुचाकीने (एमएच १५ ईडी ६४८१) शिरवाडेकडून वडनेरभैरवकडे महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी वडाळीभोईच्या दिशेने भरधाव जाणाºया मालेगाव आगाराच्या बसने (क्र. एमएच २९, बीएल ४२२०) दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार संजय भिका डंबाळे यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. त्यांना तातडीने पिंपळगाव प्राथमिक रुग्णालयात नेण्यात आले.
डॉक्टरांनी मृत घोषित करत शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मुलाच्या फिर्यादीवरून बसचालक प्रवीण श्यामराव
कचवे यांच्याविरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळगाव पोलीस करीत आहेत.जमाव संतप्तअपघातानंतर बसचालकाने बस सोडून दुसºया बसने पलायन केले. संतप्त जमावाने महामार्गावर येणाºया प्रत्येक बसला अडविले. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अपघात झालेल्या बसव्यतिरिक्त महामार्गावर असलेल्या बसवर जमावाने दगडफेक केल्याने त्या मालेगाव आगाराच्या बसव्यतिरिक्त नांदगाव व मनमाड आगाराच्या बसचेदेखील नुकसान झाले आहे.मृत व्यक्ती शिरवाडे वणी येथील असल्याने संतप्त जमावाने अपघातानंतर महामार्गावर येणाºया प्रत्येक बस अडविली. तब्बल वीस बसेस जमावाने रोखून धरल्या होत्या. त्यात तीन बसेसवर दगडफेक करून काचा फोडल्या; परंतु घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जमावाला शांत केल्यामुळे महामार्गावर अन्य बसेसचे होणारे नुकसान टळले.शिरवाडे वणी फाटा मृत्यूचा सापळाशिरवाडे फाट्याजवळ गेल्या
पाच वर्षांचा आकडा बघितला तर अपघात होऊन याठिकाणी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
वेळोवेळी याठिकाणी पुलाची मागणी करूनदेखील योग्य तो निर्णय घेतला जात नसल्याने नागरिकांनी होत असलेल्या अपघातांमुळे नाराजी व्यक्त केली
आहे.

Web Title: The mob rocks on buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.