दरवाढ नसल्याने दूध उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 10:44 PM2020-08-12T22:44:48+5:302020-08-13T00:03:20+5:30

कवडदरा : दर नसल्याने इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कोरोना विषाणूचा कहर शेतकऱ्यांचे शेतमाल आणि दुधाचे उत्पादन मातीमोल करीत आहे. यापूर्वी अफवांचा बाजार उठल्याने कुक्कुटपालक आर्थिक गर्तेत सापडले होते. आता सर्वच शेतकºयांसह दुग्धोत्पादकांना याचा फटका बसत आहे.

Milk producers in crisis due to lack of price hike | दरवाढ नसल्याने दूध उत्पादक संकटात

दरवाढ नसल्याने दूध उत्पादक संकटात

Next
ठळक मुद्देपशुपालकांना आर्थिक फटका : डेअरीतून विक्रीचाही वाढला गोंधळ !

लोकमत न्यूज नेटवर्क
कवडदरा : दर नसल्याने इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
कोरोना विषाणूचा कहर शेतकऱ्यांचे शेतमाल आणि दुधाचे उत्पादन मातीमोल करीत आहे. यापूर्वी अफवांचा बाजार उठल्याने कुक्कुटपालक आर्थिक गर्तेत सापडले होते. आता सर्वच शेतकºयांसह दुग्धोत्पादकांना याचा फटका बसत आहे. नगरमध्ये सायंकाळी ५ वाजेनंतर दुधाच्या डेअºया (विक्री केंद्र) चालू ठेवल्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जात आहे. परिणामी दुधाचे भाव पडलेले असतानाच आता त्याच्या विक्रीचाही गोंधळ वाढला आहे.
सरकारी यंत्रणेच्या चुकीच्या धोरणातून कोणाचेही नुकसान झाले तरीही नुकसानभरपाई दूरच, सरकारी यंत्रणा साधी दिलगिरी व्यक्त करण्याचीही तसदी घेत नाहीत. वर्षानुवर्षे हाच कित्ता चालू आहे. लॉकडाऊन झाल्यावर सरकारी नोकरदारवगळता खासगी नोकरदार, गरीब, कष्टकरी आणि शेतकरी यांच्यासह व्यावसायिक आर्थिक गर्तेत सापडले आहेत.
पगार किंवा मिळकत नसल्याने अनेकजण कर्ज मागत फिरत आहेत. मात्र, कर्ज देणाºयांचीही वणवा आहे. अशावेळी दुधाचे भाव १७ रुपये लिटर इतके खाली आलेले आहेत. अशावेळी दुधाच्या विक्रीला सायंकाळी ५ वाजेच्या आतली अट टाकण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यांनी त्यामुळे ५ नंतर सुरू असलेल्या दूध डेअºया व विक्री केंद्रांना ५०० ते पाच हजार रुपये इतका दंड आकारल्याचे डेअरीवाल्यांचे म्हणणे आहे. त्यावर डेअरीवाले व शेतकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.उत्पादकांवर दूध फेकण्याची वेळकोरोनामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, दूध सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन टप्प्यांत काढून विकावे लागते. सकाळी दुधाची विक्री होते. मात्र, सायंकाळी हे शक्य होत नाही. त्यामुळे दुधाची साठवणूक करण्याची सोय नसल्याने दूध खराब होऊन फेकावे लागत आहे. एकतर भाव नाही. तोट्यात दूध विकावे लागत आहे. त्यात प्रशासनाने ही भूमिका घेतल्याने उत्पादित दूध फेकण्याची वेळ आलेली आहे.

Web Title: Milk producers in crisis due to lack of price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.