ननाशी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 12:05 AM2021-05-09T00:05:51+5:302021-05-09T00:13:32+5:30

नाशिक : दिंडोरी तालुक्यासह पेठ, सुरगाणा तालुक्याच्या सीमावर्ती भागातील घाटमाथा परिसरात असलेल्या डोंगराळ आदिवासी पट्ट्यात विशेषत: ननाशी परिसरात भूकंपाचे २.३ रिस्टर स्केलचे सौम्य धक्के शनिवारी (दि.८) पहाटे ५.०९ वाजता जाणवले. या परिसरात मागील दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. त्यामुळे या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

Mild tremors in Nanashi area | ननाशी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

ननाशी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

Next
ठळक मुद्देमेरी संस्थेकडे २.३ रिस्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद

नाशिक : दिंडोरी तालुक्यासह पेठ, सुरगाणा तालुक्याच्या सीमावर्ती भागातील घाटमाथा परिसरात असलेल्या डोंगराळ आदिवासी पट्ट्यात विशेषत: ननाशी परिसरात भूकंपाचे २.३ रिस्टर स्केलचे सौम्य धक्के शनिवारी (दि.८) पहाटे ५.०९ वाजता जाणवले. या परिसरात मागील दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. त्यामुळे या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

मेरी संस्थेकडे २.३ रिस्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली असून, नाशिकपासून ९६ किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांनी दिली. सदर परिसर आदिवासी वाडीवस्तीचा असून, डोंगराळ व घाटाचा आहे. मागील वर्षी याच दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवल्याने गावांमध्ये असणारे बसण्याचे बाकडे तुटून पडले होते तसेच गोठ्यातील जनावरेही धावू लागली होती. याबाबत नागरिकांनी प्रशासनास माहिती कळवली होती. भविष्यात पुन्हा भूकंपाच्या धक्क्यातून या भागात मनुष्य, वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच या परिसरात भूकंपमापन यंत्र बसवून योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

घरांच्या भिंती हादरल्या
सदर धक्क्यामुळे कुठलीही मनुष्य व वित्तहानी झालेली नाही. पहाटे भूकंपाचा आवाज होऊन परिसरातील गांडोळे, देहेरे कुईआंबी, उपिळपाडा, सावरपातळी, चीकाडी, शृंगारपाडा या गावातील घरांचे पत्रे हलू लागले, घरांच्या भिंती हादरत असल्याचे जाणवले. जमीनही हादरल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले.

Web Title: Mild tremors in Nanashi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.