Nashik Mhada Lottery: सोन्याहून पिवळं! फक्त १४ लाखात नाशिकमध्ये म्हाडाचे घर, लोकेशन काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 08:13 IST2025-12-02T08:12:59+5:302025-12-02T08:13:55+5:30

MHADA Nashik Housing Lottery 2025: नाशिकमध्ये हक्काचं घर खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली.

MHADA Nashik Housing Lottery 2025: Online Applications Open For 402 Flats-Prices, Locations & How To Apply | Nashik Mhada Lottery: सोन्याहून पिवळं! फक्त १४ लाखात नाशिकमध्ये म्हाडाचे घर, लोकेशन काय?

Nashik Mhada Lottery: सोन्याहून पिवळं! फक्त १४ लाखात नाशिकमध्ये म्हाडाचे घर, लोकेशन काय?

मुंबई : 'म्हाडा'च्या नाशिक मंडळातर्फे नाशिक शहरातील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव, सातपूर शिवारात असलेल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील ४०२ घरे आगाऊ अंशदान तत्त्वावर विकण्यासाठी लॉटरी काढली जाणार आहे. या घरांच्या किमती १४ लाख ९४ हजार २३ रुपये ते ३६ लाख ७५ हजार २३ रुपयांदरम्यान आहेत.

वांद्रे मुख्यालयात लॉटरीसाठीच्या ऑनलाइन अर्ज नोंदणी व स्वीकृतीला सोमवारी 'म्हाडा'चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. जयस्वाल यांनी सांगितले की, २०२५ मध्ये नाशिक मंडळाने यापूर्वी तीन लॉटरीद्वारे ८४६ घरे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. २०२५ मध्ये आयोजित ही चौथी लॉटरी असून परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, आगाऊ अंशदान म्हणजे ज्या घरांची लॉटरी काढली जात आहे, ती घरे अद्याप बांधलेली नाहीत. लॉटरीत विजेत्यांना घरांची विक्री किंमत पाच टप्प्यांमध्ये भरता येणार आहे.

कुठे, किती घरे उपलब्ध ?

लॉटरीत अल्प उत्पन्न गटासाठी चुंचाळे शिवारात १३८ घरे, पाथर्डी शिवारात ३०, मखमलाबाद शिवारात ४८, आडगाव शिवारातील ७७अशा एकूण २९३ घरांचा लॉटरीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी सातपूर शिवारात ४०, पाथर्डी शिवारात ३५, आडगाव शिवारात ३४ अशी एकूण १०९ घरे विक्रीसाठी आहेत.

कोणती कागदप्रत्रे हवीत?

अर्जदारास १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. शिवाय, अर्जदाराचे आयकर विवरणपत्र अथवा तहसील कार्यालयाचे उत्पन्न प्रमाणपत्र यातील एक उत्पन्न पुरावा ग्राह्य धरला जाईल.

Web Title : नासिक म्हाडा लॉटरी: 14 लाख से शुरू, किफायती घर!

Web Summary : म्हाडा नासिक लॉटरी द्वारा नासिक में 402 घर दे रहा है। कीमतें 14.94 लाख से 36.75 लाख तक हैं। ऑनलाइन पंजीकरण खुला है। अप्रैल 2024-मार्च 2025 से आय प्रमाण आवश्यक है। मकान निर्माणाधीन हैं; भुगतान किश्तों में है।

Web Title : Nashik MHADA Lottery: Affordable Homes Available from ₹14 Lakh!

Web Summary : MHADA Nashik offers 402 homes in Nashik via lottery. Prices range from ₹14.94 to ₹36.75 lakh. Online registration is open. Income proof from April 2024-March 2025 is required. Houses are under construction; payments are in installments.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.