मनपा विषय समित्यांच्या बैठका आता व्हीडीओ कॉन्फरसिंगव्व्दारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 07:29 PM2020-07-08T19:29:54+5:302020-07-08T19:34:56+5:30

नाशिक- महापालिकेच्या महासभेप्रमाणेच आता विविध विषय समित्यांच्या सभा व्हीडीओ कॉन्फरसिंगव्व्दारे घेण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. तथापि, महापालिकेतील तीन समित्यांची मुदत बुधवारी (दि.८) संपुष्टात आली आहे. त्यामुळे त्यांना लाभ होणार नाही आणि नवीन समित्यांच्या निवडीसाठी सभा देखील होऊ शकणार नाहीत.

Meetings of Municipal Subject Committees are now via video conferencing | मनपा विषय समित्यांच्या बैठका आता व्हीडीओ कॉन्फरसिंगव्व्दारे

मनपा विषय समित्यांच्या बैठका आता व्हीडीओ कॉन्फरसिंगव्व्दारे

Next
ठळक मुद्देशासनाचा महत्वपूर्ण निर्णयस्थायी समितीची बैठक आॅनलाईनच होणार

नाशिक- महापालिकेच्या महासभेप्रमाणेच आता विविध विषय समित्यांच्या सभा व्हीडीओ कॉन्फरसिंगव्व्दारे घेण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. तथापि, महापालिकेतील तीन समित्यांची मुदत बुधवारी (दि.८) संपुष्टात आली आहे. त्यामुळे त्यांना लाभ होणार नाही आणि नवीन समित्यांच्या निवडीसाठी सभा देखील होऊ शकणार नाहीत.

मार्च महिन्यात कोरोनाचे महासंकट आल्यानंतर शासकिय कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाले आहे. त्याच प्रमाणे महापालिकेत देखील सर्व बैठका आणि सभा रद्द करण्यात आल्या आहेत. महासभा किंवा समित्यांच्या सभा घेणे हे कायदेशीरदृष्टया बंधनकारक असल्याने शासनाने महापालिकेला पत्र पाठवून आपल्या स्तरावर निर्णय घेण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतर आत्तापर्यंत दोन वेळा महापालिकेची मासिक महासभा आॅनलाईन घेण्यात आली आहे. तर स्थायी समितीच्या दोन बैठका प्रत्यक्ष सभागृहातील उपस्थितीने घेण्यात आल्या आहेत.

विधी, महिला व बाल कल्याण आणि वैद्यकिय सहाय्य या समित्यांच्या या तीन महिन्याच्या कालावधीत एकही बैठक घेता आलेली नाही. मात्र, आता शासनाचे उपसचिव कैलास बधान यांनी महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती अधिनियमातील सर्व सभा, बैठका व्हीडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे घेता येईल असे कळवले आहे.

अर्थात, महपाालिकेतील विधी, महिला व बाल कल्याण तसेच आरोग्य व वैद्यकिय समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ बुधवार (दि.८) संपुष्टात आला आहे. नवीन सदस्य नियुक्तीस तूर्तास शासनाने बंदी घेतल्याने या समित्यांच्या निवडणूका रखडल्या आहेत. तर स्थायी समितीची बैठक गुरूवारी (दि.९) आॅनलाईन पध्दतीने होणार आहे.

Web Title: Meetings of Municipal Subject Committees are now via video conferencing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.