इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये नाशिकच्या समावेशासाठी मुंबईत घेणार बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:17 AM2019-06-15T01:17:40+5:302019-06-15T01:18:16+5:30

दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलमेंट कार्पोरेशनमुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत प्रगतिशील होणार असून, सदर योजना कार्यान्वित होण्यासाठी लवकर मुंबईत विशेष बैठक घेणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

The meeting will take place in Mumbai for industrial condoms including Nashik | इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये नाशिकच्या समावेशासाठी मुंबईत घेणार बैठक

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलमेंट कॉर्पोरेशनची योजना नाशिकला कार्यान्वित व्हावी या मागणीचे निवेदन सुभाष देसाई यांना देताना हेमंत गोडसे.

Next
ठळक मुद्देहेमंत गोडसे यांनी घेतली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट

सातपूर : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलमेंट कार्पोरेशनमुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत प्रगतिशील होणार असून, सदर योजना कार्यान्वित होण्यासाठी लवकर मुंबईत विशेष बैठक घेणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
नाशिक दौऱ्यावर आलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन खासदार हेमंत गोडसे यांनी देसाई यांना दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलमेंट कार्पोरेशनची योजना नाशिक येथे कार्यान्वित व्हावी या मागणीचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलमेंट कार्पोरेशनची योजना नाशिकला लवकर कार्यान्वित होण्यासाठी केंद्र सरकारच्या उद्योग मंत्रालयाकडे शिफारस करावी, अशी मागणी खासदार गोडसे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. या मागणीचा विचार करून नाशिकला दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कार्यान्वित व्हावी यासाठी मुंबईत विशेष बैठक घेण्याचे ठोस आश्वासन देसाई यांनी अंबड येथील अग्निशमन केंद्राच्या उद््घाटनप्रसंगी दिले.
जिल्ह्यात समाधानाचे वातावरण
केंद्र शासनाने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये नाशिकचा समावेश केला आहे. या कॉरिडॉरमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रे, रायगड जिल्ह्यातील दिघीपोर्ट आणि नाशिक जिल्ह्यातील सातपूर, अंबड, मुसळगाव, माळेगाव, गोंदे, दिंडोरी या औद्योगिक वसाहतींचा सर्वांगीण विकास होणार असल्याने जिल्ह्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
४दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्हलमेंट कार्पोरेशनमुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीचा झपाट्याने विकास होणार असून, मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.

Web Title: The meeting will take place in Mumbai for industrial condoms including Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.