राधाष्टमीनिमित्त येवल्यात मिरवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:39 AM2019-09-09T00:39:47+5:302019-09-09T00:40:49+5:30

येवला : येथील लेवा पाटीदार गुजराथी समाजाच्या वतीने राधाष्टमीनिमित्ताने शहरातून मिरवणूक काढून उत्सव साजरा करण्यात आला. मिरवणूक राधा-वल्लभ मंदिरात येताच राधाकृष्ण मूर्तीचे पूजन करण्यात आले.

Meeting for Radhashtami | राधाष्टमीनिमित्त येवल्यात मिरवणूक 

येवला येथे राधाष्टमीनिमित्ताने राधा-वल्लभ देवतेच्या काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी युवक.

Next
ठळक मुद्देशहरातून मिरवणूक काढून उत्सव साजरा

येवला : येथील लेवा पाटीदार गुजराथी समाजाच्या वतीने राधाष्टमीनिमित्ताने शहरातून मिरवणूक काढून उत्सव साजरा करण्यात आला.
मिरवणूक राधा-वल्लभ मंदिरात येताच राधाकृष्ण मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रसादाची सेवा सरदार वल्लभ मंडळाने घेतली होती. लेवा पाटीदार समाजातील शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या राशी भारत पटेल, वरद पटेल, मानसी पटेल, अभी पटेल, कुशल पटेल, ईश्वर पटेल यांचा डॉ. अशोक पटेल, यतिन पटेल, शैलेश गुजराथी, नवीन देसाई आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर परदेशात शिक्षणासाठी जाणाºया अमेय परमार्थ यास शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी मुकुल पटेल, चमन पटेल, भूषण पटेल, मनोज पटेल, शैलेश देसाई, सत्यप्रकाश पटेल, प्रणय गुजराथी, सुशीलचंद्र गुजराथी, अरुण गुजराथी, नगरसेवक छाया देसाई, हर्षाबेन पटेल, प्रीतिबाला पटेल आदी उपस्थित होते.

Web Title: Meeting for Radhashtami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर