खेडलेझुंगे सरपंचपदी माया सदाफळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 08:55 PM2021-03-01T20:55:37+5:302021-03-02T02:20:22+5:30

खेडलेझुंगे : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माया विजय सदाफळ तर उपसरपंचपदी संगीता बळीराम माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Maya Sadaphal as Sarpanch | खेडलेझुंगे सरपंचपदी माया सदाफळ

बिनविरोध निवड झाल्याने सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

Next
ठळक मुद्देउपसरपंचपदी संगीता माळी बिनविरोध

खेडलेझुंगे : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माया विजय सदाफळ तर उपसरपंचपदी संगीता बळीराम माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी उमेश शिवनकर यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक शरद बोडखे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली. सरपंच पदासाठी माया विजय सदाफळ व उपरपंच पदासाठी संगीता बळीराम माळी यांचेच अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदी माया विजय सदाफळ व उपसरपंचपदी संगीता बळीराम माळी यांना बिनविरोध घोषित करण्यात आले.

 

Web Title: Maya Sadaphal as Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.