केळझर कालव्यास प्रचंड पाणी गळती शेतकर्यांचे लाखो रु पयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 11:03 PM2020-09-19T23:03:09+5:302020-09-20T00:38:22+5:30

डांगसौंदाणे वार्ताहर: पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे केळझर धरण कालव्यास दगडी साकोडे,डांगसौंदाणे, गव्हाणेपाडा येथे प्रचंड पाणी गळती झाल्याने अनेक गावातील असंख्य शेतकर्यांच्या शेतमालाचे व शेतीचे लाखो रु पयांचे नुकसान झाल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी केळझर धरणावर धडक देत पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना कालव्याचे गेट बंद करण्यास भाग पाडले.

Massive water leakage to Keljar canal causes loss of millions of rupees to farmers | केळझर कालव्यास प्रचंड पाणी गळती शेतकर्यांचे लाखो रु पयांचे नुकसान

केळझर कालव्यास प्रचंड पाणी गळती शेतकर्यांचे लाखो रु पयांचे नुकसान

Next
ठळक मुद्देसंतप्त शेतकर्यांची केळझर धरणावर धडक, कालव्याचे पाणी बंद करण्यास भाग पाडले

डांगसौंदाणे वार्ताहर: पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे केळझर धरण कालव्यास दगडी साकोडे,डांगसौंदाणे, गव्हाणेपाडा येथे प्रचंड पाणी गळती झाल्याने अनेक गावातील असंख्य शेतकर्यांच्या शेतमालाचे व शेतीचे लाखो रु पयांचे नुकसान झाल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी केळझर धरणावर धडक देत पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना कालव्याचे गेट बंद करण्यास भाग पाडले.

केळझर धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने वाहून जाणारे पूर पाणी केळझर कालव्यात टाकून पुढे चारी क्र .? मध्ये टाकण्याची चाचणी घेण्यासाठी सोडण्यात आले होते मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी कालवा दुरु स्त न करताच पूर पाणी कालव्यात टाकल्याने दगडी साकोडे, डांगसौंदाणे, गव्हाणेपाडा येथे प्रचंड पाणी गळती होऊन शेती व लाखो रु पयांच्या शेतमालाचे नुकसान झाल्याने शेतकरी संतप्त झाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच बागलाण चे आमदार दिलीप बोरसे यांनी भेट देऊन पाहणी केली होती व शेतकर्यांचे नुकसान झाल्याने कालवा दुरु स्त होईपर्यंत शेतकर्याना दिलासा द्यावा अश्या सूचना पाटबंधारे विभागाला केल्या होत्या. मात्र आमदारांच्या सूचना धुडकावत पाटबंधारे विभागाने कालव्याचे पाणी बंद न केल्याने शेतकरी आक्र मक झाले होते. दगडी साकोडे येथे कालव्याच्या गळतीचे प्रमाण जास्त असून दुरु स्तीचे टेंडर निघूनही काम संथगतीने सुरू असून काम निकृष्ठ दर्जाचे असल्याची तक्र ार ग्रामस्थांनी पालकमंत्री छगन भुजबळ,कृषी मंत्री दादा भुसे,जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाकडे केली असून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या प्रसंगी हेमंत चंद्रात्रे,मनोहर सोनवणे, दशरथ बागुल, अर्जुन भोये,शंकर बिहरम, हिरामण सोनवणे, जनक सोनवणे, यशवंत गांगुर्डे यांच्या सह डांगसौंदाणे, साकोडे, गव्हाणेपाडा गावातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Massive water leakage to Keljar canal causes loss of millions of rupees to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.