नायगाव-पिंपळगाव रस्त्याची मोठया प्रमाणावर दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 06:54 PM2019-09-16T18:54:28+5:302019-09-16T18:55:11+5:30

नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडला जाणारा नायगाव-पिंपळगाव (निपाणी) या रस्त्याची मोठया प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. संबंधित विभाग शेवटच्या भागाकडे दुरूस्तीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे परिसरातील नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहे.

Massive mismanagement of Naigaon-Pimpalgaon road | नायगाव-पिंपळगाव रस्त्याची मोठया प्रमाणावर दुरवस्था

सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाºया नायगाव-पिंपळगाव या रस्त्याची झालेली दुरवस्था.

Next
ठळक मुद्देतेथील खडीमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.

नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडला जाणारा नायगाव-पिंपळगाव (निपाणी) या रस्त्याची मोठया प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. संबंधित विभाग शेवटच्या भागाकडे दुरूस्तीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे परिसरातील नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहे.
नायगाव - पिंपळगाव हा सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून तेथील खडीमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.
त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांच्या रस्त्यासाठी अर्धातासाचा वेळ जास्त लागत आहे. तसेच मोकळ्या खडीमुळे वाहने नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.
पिंपळगाव येथील ग्रामस्थांचे दैनंदिन व्यवहार नायगावशी निगडीत असल्याने या रस्त्यावर वाहनांची नेहमी ये-जा सुरू असते. तसेच शेतकऱ्यांना नाशिक येथे शेतीमाल नेण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. मात्र या मार्गाची दुरवस्था झाल्याने शेतकºयांना शेतीमाल बाजारात वेळेत नेण्यासाठी लांबच्या सायखेडा मार्गाने जावे लागत असल्याने वेळ आणि आर्थिक झळ शेतकºयांना सोसावी लागत आहे.
सध्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल व खड्यात पाणी साचत असल्यामुळे वाहन चालकांची फसगत होऊन अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची वेळीच दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दोन तालुक्यांच्या गावांना जोडणाºया या महत्वाच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासुन संबंधित विभागाने दुरूस्ती व नुतनीकरण केले नाही. दोन्ही तालुक्यांचे शेवटचे गावे असल्यामुळे या रस्त्याकडे जाणून-बुजून बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे.
- सुनिल कातकाडे, सामाजिक कार्यकर्ते, नायगाव.

Web Title: Massive mismanagement of Naigaon-Pimpalgaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.