वारीसाठी जमविलेल्या पैशातून वृध्दआजीने वितरीत केले मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 06:53 PM2020-07-02T18:53:43+5:302020-07-02T18:55:34+5:30

इगतपुरी : कोरोनाव्हायरसच्या उद्रेकाचा परिणाम फक्त सामान्य जीवनावरच झाला नाही, तर भक्ती जीवनावरही त्याचा परिणाम झाला. इतिहासात प्रथमच पंढरपूरची वारी रद्द केली गेली आणि केवळ निवडलेल्या लोकांना पालखीस परवानगी होती. बऱ्याच वर्षांची परंपरा तुटल्याने वारकरी अस्वस्थ झाले. पण ९० वर्षांच्या वारकरी आजीने एक अनोखे उदाहरण उभे केले आहे.

Masks distributed by the old lady from the money collected for Wari | वारीसाठी जमविलेल्या पैशातून वृध्दआजीने वितरीत केले मास्क

इगतपुरी तालुक्यातील ९० वर्षाच्या आजी नातवंडासमवेत वारीच्या पैशातुन खरेदी केलेल्या मास्कची वर्गवारी करतांना.

googlenewsNext
ठळक मुद्देइगतपुरी : ५६ वर्षात प्रथमच पडला पांडूरंगाच्या दर्शनात खंड

लोकमत न्युज नेटवर्क
इगतपुरी : कोरोनाव्हायरसच्या उद्रेकाचा परिणाम फक्त सामान्य जीवनावरच झाला नाही, तर भक्ती जीवनावरही त्याचा परिणाम झाला. इतिहासात प्रथमच पंढरपूरची वारी रद्द केली गेली आणि केवळ निवडलेल्या लोकांना पालखीस परवानगी होती. बऱ्याच वर्षांची परंपरा तुटल्याने वारकरी अस्वस्थ झाले. पण ९० वर्षांच्या वारकरी आजीने एक अनोखे उदाहरण उभे केले आहे.
इगतपुरी तालुक्याच्या घोटी गावातील चंद्रभागा किसन पुणेकर या आजीने निराश होण्याऐवजी लोकांना प्रेरणादायक धडा दिला. यावर्षीचा पंढपूर वारीसाठी ठेवलेल्या बचतीतून आजीने मास्क वितरित केले आहे. कोरोना प्रादुर्भाव मुळे वारी रद्द झाल्याने परिस्थितीला दोष देण्याऐवजी आजीने जमा केलेल्या ५ हजार रु पयांमधून आतापर्यंत २५० मास्क वाटून समाजाची सेवा केली.
साल १९६४ पासून आजी वारीसाठी जात आहेत. तेव्हापासून गेल्या ५६ वर्षात यावर्षी कोरोनाच्या उद्रेकामुळे वारीला अडचणीत आणले. वारीला जाता नआलल्याने या आजीने आपल्या नातवांना वारीसाठी ठेवलेल्या पैशातून काहीतरी करण्याचा विचार सांगितला, त्यानुसार तिच्या नातवांनी त्यांना मास्क वितरित करण्यास सूचविले. आणि अखेर आपल्या नातवांच्या मदतीने आजीने मास्क खरेदी केले व ते सरकारी कार्यालयांमध्ये तसेच गरजूंना वाटप करण्यास सांगितले. आजीला चार मुले, पाच नातवंडे आणि सात पणतू आहेत. वारीसाठी ठेवलेल्या पौशातून समाजात मास्क वितरण करून एक आदर्श निर्माण केला आहे.
 

Web Title: Masks distributed by the old lady from the money collected for Wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.