नांदगावी चिमुकल्यासह विवाहितेची आत्महत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 02:19 PM2019-11-13T14:19:09+5:302019-11-13T14:19:28+5:30

नांदगाव : गणेशनगर परिसरात एका विवाहितेने दीड वर्षाच्या मुलाला गळफास लावून आणि नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Marriage suicide with nandagavi lizard | नांदगावी चिमुकल्यासह विवाहितेची आत्महत्त्या

नांदगावी चिमुकल्यासह विवाहितेची आत्महत्त्या

Next

नांदगाव : गणेशनगर परिसरात एका विवाहितेने दीड वर्षाच्या मुलाला गळफास लावून आणि नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. नांदगाव तालुक्यातील माणिकपुंजच्या गणेश नगर वस्तीत भरदिवसा हा प्रकार घडला. या प्रकरणी मृत विवाहितेचा पती गोरख मेंगाळ याने पत्नी राहीबाई हिने आपल्या मुलाचा गळफास लावून खून केला व नंतर स्वत:स गळफास लावून आत्महत्या केल्याची फिर्याद नांदगाव पोलिसात मंगळवारी रात्री दोन वाजता दिली. मृताच्या आई वडिलांनी याप्रकरणी आपली
तक्र ार नसल्याचे सांगितले असल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
चार वर्षापूर्वी कुसुमतेल येथील राहीबाईचा विवाह माणिकपुंज गावच्या गणेशनगर वस्तीत राहणाऱ्या गोरख मेंगाळ यांचेशी झाला. त्यानंतर संदीप या मुलास राहीबाईने जन्म दिला. यंदाच्या दिवाळीला राहीबाई माहेरी आली होती. आठ दिवस राहून गेली. वैवाहिक जीवनाबद्दल तिने कधीच तक्र ार केली नव्हती असे तिचे वडील विलास भूतांबरे यांचे म्हणणे आहे. हे कसे घडले हेच कळत नाही अशी प्रतिक्रि या त्यांनी दिली.
१२ नोव्हेबर रोजी तिचा पती गोरख खडी क्र शरच्या कामावर गेला तर दीर शरद मेंगाळ व त्याची पत्नी शेतात कामाला गेले. सायंकाळी शेतातून परत आलेल्या शरद याला घराचा बंद दरवाजा खटखटावून आतून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून छपरावर जाऊन कौले उचकावून आत बघितले असता पुतण्या संदीप व राहीबाई गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. यामुळे घाबरलेल्या शरद याने तातडीने गोरखला फोन करून बोलावून घेतले. पोलीस पाटील सदाशिव मेंगाळ यांनी पोलिसांना कळवले. पोलीस आल्यानंतर दोन्ही मृतदेह खाली उतरविण्यात आले.
घराच्या वाशाला नायलाँन दोर अडकवून पलंगाच्या कडेला उभे राहुन तिने उडी घेतल्याने गळफास आवळला गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तिचे सासू सासरे गेली सहा वर्षे वनविभागाच्या जमिनीवर खोपीत राहतात. घरी पती, दीर, त्याची पत्नी जाईबाई व राहीबाई आणि संदीप असे राहत असत. शवविच्छेदनात सकृतदर्शनी गळफासाने मृत्यू झाल्याचे दिसत असून अंगावर इतर जखमा नाहीत असे डॉ. रोहन बोरसे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Web Title: Marriage suicide with nandagavi lizard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक