आयटीआयमध्ये सॅनिटायझर मशीनची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:57 PM2020-07-11T22:57:19+5:302020-07-12T01:53:54+5:30

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका शिक्षकाने लॉकडाऊनकाळात रोजच्या उपकरणांमध्ये दिसणाऱ्या माउंट बोर्ड, बारा वोल्ट डीसी मोटर, सेन्सर्स, ट्रांजिस्टर, रिचार्जेबल बॅटरी आदी साहित्य वापरून एक लिटर क्षमतेचे सॅनिटायझर मशीनची निर्मिती केली आहे.

Manufacture of Sanitizer Machine in ITI | आयटीआयमध्ये सॅनिटायझर मशीनची निर्मिती

मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने तयार केलेल्या स्वयंचलित सॅनिटायझर यंत्राची पाहणी करताना प्रादेशिक सहायक संचालक आर. एस. मानकर. समवेत माधुरी भामरे, मोहन तेलंगी, विवेक रनाळकर आदी.

Next
ठळक मुद्देएक लिटरची क्षमता : नियमित वापरातील साहित्याच्या साह्याने साकारला कल्पनाविष्कार

सातपूर : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका शिक्षकाने लॉकडाऊनकाळात रोजच्या उपकरणांमध्ये दिसणाऱ्या माउंट बोर्ड, बारा वोल्ट डीसी मोटर, सेन्सर्स, ट्रांजिस्टर, रिचार्जेबल बॅटरी आदी साहित्य वापरून एक लिटर क्षमतेचे सॅनिटायझर मशीनची निर्मिती केली आहे.
दैनंदिन वापराच्या उपकरणांमध्ये दिसणाºया माउंट बोर्ड, बारा वोल्ट डीसी मोटर, सेन्सर्स, ट्रांजिस्टर, रिचार्जेबल बॅटरी आदी साहित्यांचा वापर करून एक लिटर क्षमतेचे सॅनिटायझर मशीन तयार केले आहे. हे उपकरण तयार करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व काळजी घेण्यात आली असून, नेहमीच्या वापरातील मोबाइल चार्जरच्या मदतीने हे मशीन चार्ज करता येते. या उपकरणाची यशस्वी प्रात्यक्षिक झाल्यानंतर संजय म्हस्के यांनी व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहायक संचालक आर. एस. मानकर यांच्यासमोर या सॅनिटायझर मशीनचे सादरीकरण केले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य माधुरी भामरे, गटनिदेशक मोहन तेलंगी, विवेक रनाळकर उपस्थित होते. विशेष म्हणजे लॉकडाऊनकाळात अवघ्या तीन दिवसांत अवघ्या तीन दिवसांत त्यांनी हे मशीन तयार केले.

पूर्णपणे सुरक्षित यंत्र
नावीन्यपूर्ण आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने अत्यंत अल्पखर्चात आणि नियमित वापरात असणाºया साहित्याच्या साह्याने हे मशीन तयार केले आहे. आज हँड सॅनिटायझरची सर्वत्र गरज असून, कोठेही सहज उपयोगात येईल, यापद्धतीने हे यंत्र निर्माण केले असून, ते पूर्णपणे सुरक्षित आहे.

अत्यल्प खर्च
आयटीआयमधील इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या विषयाच्या विद्यार्थिनींनी त्यांच्या कल्पकतेतून सॅनिटायझर मशीनची संकल्पना मांडली होती. विद्यार्थिनींच्या या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत संस्थेतील शिल्प निर्देशक संजय म्हस्के यांनी अत्यंत अल्प खर्चात आणि नियमित वापरात असणाºया साह्याने हे मशीन तयार केले आहे. मशीनला बसविलेल्या तोटी समोर हात नेले की हातावर सॅनिटायझर आपोआप पडते.

Web Title: Manufacture of Sanitizer Machine in ITI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.