पाच फळ विक्रेत्यांवर मनमाडला गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 06:36 PM2020-07-01T18:36:40+5:302020-07-01T18:37:09+5:30

मनमाड : लॉकडाऊन काळातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनमाड नगरपालिकेने पाच फळ विक्र ेत्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. यामुळे शहरातील व्यापारी आणि व्यावसायिक धास्तावले आहेत.

Manmad charges against five fruit sellers | पाच फळ विक्रेत्यांवर मनमाडला गुन्हा दाखल

पाच फळ विक्रेत्यांवर मनमाडला गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देगर्दी कमी करण्यासाठी पालिकेने आवश्यक ती कार्यवाही केली

मनमाड : लॉकडाऊन काळातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनमाड नगरपालिकेने पाच फळ विक्र ेत्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. यामुळे शहरातील व्यापारी आणि व्यावसायिक धास्तावले आहेत.
शहरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे शहरातील गर्दी कमी करण्यासाठी पालिकेने आवश्यक ती कार्यवाही केली आहे .त्या अंतर्गत भाजी मार्केट, फ्रुट मार्केटचे शहरातील महर्षी वाल्मिक स्टेडियम, इन्स्टिट्यूट मैदान आणि सिकंदर नगर या ठिकाणी नियोजन केले आहे. परंतु काही भाजी आणि फळ विक्र ेत्यांनी सुभाष रोड येथे नियमबाह्य बाजार भरवल्याने त्यांच्याविरु द्ध पालिकेने धडक कारवाई राबवित पोलिसात तक्र ार केली .मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सदरची कार्यवाही केली.

Web Title: Manmad charges against five fruit sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.