सिन्नर तालुक्याचे माँडेल स्कुलचे मानांकन दापूर शाळेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 06:40 PM2020-10-27T18:40:03+5:302020-10-27T18:43:22+5:30

सिन्नर: राज्यभरातील ५ हजार शाळांपैकी फक्त ३०० शाळा माँडेल स्कुल म्हणून विकसीत करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद दापूर शाळेला राज्यशासनाचे नामांकन प्राप्त झाले आहे.

Mander School of Sinnar Taluka is rated as Dapur School | सिन्नर तालुक्याचे माँडेल स्कुलचे मानांकन दापूर शाळेला

सिन्नर तालुक्याचे माँडेल स्कुलचे मानांकन दापूर शाळेला

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य शासनाने शाळेसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली

सिन्नर: राज्यभरातील ५ हजार शाळांपैकी फक्त ३०० शाळा माँडेल स्कुल म्हणून विकसीत करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद दापूर शाळेला राज्यशासनाचे नामांकन प्राप्त झाले आहे.
शाळेचा भौतिक विकास ,शैक्षणिक गुणवत्ता विकास ,प्रशासकीय दर्जेदार कामकाज तसेच शाळेच्या अभ्यासापलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणे , अवांतर वाचनातून विद्यार्थ्यांंमध्ये विविध क्षमतांचा विकास करणे,विविध स्पर्धा परिक्षा ,कला ,क्रिडा,नाविण्यपुर्ण उपक्रम राबवणे यादृष्टीने दापूर शाळेची वाटचाल गेल्या वर्षभरापासून सुरू होती. याची दखल घेत राज्य शासनाने शाळेसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे व त्याचा परिणाम म्हणून राज्यातील ३०० शाळापैकी दापूर प्राथमिक शाळेची सिन्नर तालुक्यातील एकमेव माँडेल स्कुल शाळा म्हणून विकसनासाठी निवड झाल्याचा शासननिर्णय आज प्रसिद्ध झाला आहे.
जिल्ह्यातील १२ शाळापैकी दापूर ही शाळा निवडीस पाञ ठरली असून सिन्नर तालुक्याच्या शिक्षण विकासात मानाचा एकमेव तुरा या शाळेने रोवला आहे.
माजी अध्यक्ष शीतल सांगळे, युवानेते उदय सांगळे माजी आमदार राजाभाऊ वाजे गावातील सर्व ग्रामस्थ पालक ,स्थानिक पदाधिकारी, मुक्ता मोरे, कचुनाना आव्हाड,श्रीराम आव्हाड ,मोहन काकड शाळा समिती अध्यक्ष भाऊसाहेब कांदे ,संजय आव्हाड,योगेश तोंडे,एस.पी.आव्हाड,संदिप आव्हाड ,अजित निरगुडे ,सुनिल आव्हाड ,राजु सोमाणी यांच्या विशेष सहकार्य व प्रयत्नातून यशाला गवसणी घालता आली
याकामी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,शिक्षणाधिकारी ( माध्य) वैशाली वीर राजीव म्हसकर ( प्राथ.), मा.गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ ,विदयमान गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंके ,बीटविस्तारअधिकारी राजीव लहामगे ,केंद्रप्रमुख प्रतिभा कुडके ,मुख्याध्यापक चंद्रकला सोनवणे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली आहे
शाळेचे उपक्रमशील व सतत नाविन्याचा शोध घेणारे तंञस्नेही शिक्षक गोरक्ष सोनवणे यांनी याकामी विशेष परिश्रम घेऊन नाविन्यपुर्ण व गुणवत्ता पूर्ण उपक्रम राबवून शाळा नावारूपास आणली .याकामी त्यांना त्यांचे सहकारी शिक्षक गायञी रजपूत,पल्लवी घुले ,शितल सोनवणे,सुनंदा कोकाटे मनिषा गोराडे,कृष्णकांत कदम ,निता वायाळ आदीचे सहकार्य लाभत आहे पूढील कामकाजासाठी कटिबदध राहुन जबाबदारी वाढल्याचे मुख्याध्यापक चंद्रकला सोनवणे यांनी सांगितले

फोटो- जिल्हा परिषद शाळा दापुर इमारत
 

Web Title: Mander School of Sinnar Taluka is rated as Dapur School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.