मालेगाव तालुक्यात समान मते मिळाल्याने तिघांचे निकाल चिठ्ठी पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 09:07 PM2021-01-18T21:07:53+5:302021-01-19T01:40:20+5:30

मालेगाव : तालुक्यातील ढवळेश्वर, वळवाडे व वनपट या ग्रामपंचायतीत उमेदवारांना सारखीच मते पडल्याने चिठ्ठी पद्धतीने निकाल देण्यात आला.

In Malegaon taluka, due to the same number of votes, the results of the three were by letter | मालेगाव तालुक्यात समान मते मिळाल्याने तिघांचे निकाल चिठ्ठी पद्धतीने

मालेगाव तालुक्यात समान मते मिळाल्याने तिघांचे निकाल चिठ्ठी पद्धतीने

Next
ठळक मुद्दे गुलाब गुंजाळ यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित

मालेगाव : तालुक्यातील ढवळेश्वर, वळवाडे व वनपट या ग्रामपंचायतीत उमेदवारांना सारखीच मते पडल्याने चिठ्ठी पद्धतीने निकाल देण्यात आला. यात ढवळेश्वरला वॉर्ड क्रमांक २ मध्ये अनुसूचित जमातीच्या जागेसाठी रिंगणात असलेल्या ज्ञानेश्वर सीताराम गायकवाड व गुलाब रंगनाथ गुंजाळ यांना २७३ समसमान मते पडली. त्यामुळे सुमीत केदारे या मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यात गुलाब गुंजाळ यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

प्रभाग २ मध्ये आणखी एक प्रकार तसाच घडला. त्यात तेजल पवार व शोभाबाई पवार यांना प्रत्येकी पुन्हा २७३ मते पडली. त्यामुळे पुन्हा चिठ्ठी काढण्यात आली. त्यात शोभाबाई पवार यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. वळवाडे येथे प्रभाग क्रमांक ३ मध्ये सोनाली पवार आणि सुरेखा शेवाळे यांना प्रत्येकी १६७ अशी समसमान मते मिळाली.

साक्षी विलास जाधव या मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सोनाली पवार यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. वनपट येथील प्रभाग २ मध्ये मंगलबाई शिंदे आणि सुभाबाई सोनवणे यांना प्रत्येकी १८३ मते मिळाली. त्यात सुभाबाई सोनवणे विजयी झाल्या.

Web Title: In Malegaon taluka, due to the same number of votes, the results of the three were by letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.