मालेगाव कॅम्पमध्ये दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 01:10 AM2019-10-20T01:10:20+5:302019-10-20T01:11:26+5:30

मालेगाव कॅम्प भागातील मोची कॉर्नर परिसरात धारदार शस्त्रे, लोखंडी पाईप घेऊन दोन गटात तुफान हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी दोन्ही गटातील सहा जणांना पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी दिनेश संभाजी साबणे व पापा अंबाजी पोळ यांनी परस्पर विरुद्ध फिर्याद दिली आहे.

In the Malegaon camp, the group is divided into two groups | मालेगाव कॅम्पमध्ये दोन गटांत हाणामारी

मालेगाव कॅम्पमध्ये दोन गटांत हाणामारी

Next

मालेगाव : कॅम्प भागातील मोची कॉर्नर परिसरात धारदार शस्त्रे, लोखंडी पाईप घेऊन दोन गटात तुफान हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी दोन्ही गटातील सहा जणांना पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी दिनेश संभाजी साबणे व पापा अंबाजी पोळ यांनी परस्पर विरुद्ध फिर्याद दिली आहे.
साबने यांनी दिलेल्या फिर्यादीत ते त्यांच्या मित्रांसह पापा पोळ यांच्या घरासमोरुन जात असताना त्यांना बोलावून घेत काल माझी व माझ्या भाडेकरुची तक्रार करण्यासाठी पोलीसात गेला होता अशी कुरापत काढून पोळ यांनी तलवारीने मारुन दुखापत केली. तसेच अन्य दोघांनी चॉपर, लोखंडी गजने मारहाण करुन दमदाटी केल्याचे म्हटले आहे.
पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीत पोळ हे घरी बसले असताना सोनू शनिदेव साबणे व त्याच्या सोबत असलेल्या सात जणांनी घरात येऊन शिवीगाळ करुन माझ्या प्लॉटवर दरवाजे पाडायचे नाहीत, तर जीव ठार मारु असा दम दिला. सोनू साबणे याने तलवारीने वार करुन गंभीर जखमी केले तर दुसऱ्या एका मित्राने वस्तºयाने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बाचकर हे करीत आहेत.

Web Title: In the Malegaon camp, the group is divided into two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.