जीवन सुंदर करायचे तर पुस्तके वाचली पाहिजे: विजयकुमार मिठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:54 PM2019-10-18T18:54:26+5:302019-10-18T18:55:04+5:30

पुस्तकांमुळेच तुमच्यातला माणूस घडत असतो. आजचा युवक पुस्तकांपासून दूर जातो आहे. त्याचे परिणामही तो भोगत आहे. ताण-तणाव आण िनकारात्मकतेस त्याला सामोरे जावे लागते आहे. मन आनंदी आण िसकारात्मक करण्याचं काम पुस्तके करतात. आपल्याला आपले जीवन सुंदर करायचे असेल तर पुस्तकांशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून पुस्तके वाचली पाहिजे. असे प्रतिपादन ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी केले.

To make life beautiful, you should read books: Vijaykumar Mithi | जीवन सुंदर करायचे तर पुस्तके वाचली पाहिजे: विजयकुमार मिठे

रानवड येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्र मात बोलताना साहित्यिक विजयकुमार मिठे. समवेत व्ही. एस. शिरसाठ, कवत्रि शकुंतला वाघ.

googlenewsNext
ठळक मुद्देरानवडच्या वाघ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन

रानवड : पुस्तकांमुळेच तुमच्यातला माणूस घडत असतो. आजचा युवक पुस्तकांपासून दूर जातो आहे. त्याचे परिणामही तो भोगत आहे. ताण-तणाव आण िनकारात्मकतेस त्याला सामोरे जावे लागते आहे.
मन आनंदी आण िसकारात्मक करण्याचं काम पुस्तके करतात. आपल्याला आपले जीवन सुंदर करायचे असेल तर पुस्तकांशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून पुस्तके वाचली पाहिजे. असे प्रतिपादन ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी केले. के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त के के वाघ महाविद्यालय रानवड आयोजित आणि वाचनकट्टा सांस्कृतिक मंच प्रस्तूत वाचन प्रेरणा दिनाचा कार्यक्र म घेण्यात आला. त्याप्रसंगी मिठे बोलत होते. माणसाच्या जीवनातील वाचनाचे महत्व त्यांनी वेगवेगळया उदाहरणातून समोर ठेवले. अध्यक्षस्थानी कवियत्री शकुंतला वाघ उपस्थित होत्या. म्हणाल्या, आजचा युवक मोबाईलच्या नको तेवढा आहारी जाऊन आपल्या आयुष्याचे नुकसान करून घेतो आहे. आयुष्याचा दृष्टीकोन आपल्याला वाचन देतं. म्हणून तरु णांनी वाचन केलं पाहिजे.
व्यासपीठावर प्राचार्य व्ही. एस. शिरसाठ. वाचन कट्टा सांस्कृतिक मंचचे प्रमुख प्रा. ऐश्वर्य पाटेकर, रामनाथ पानगव्हाणे उपस्थित होते. सूत्रसंचालन वैभव कुशारे याने केले. परिचय गौरी गारे तर आभार प्रदर्शन प्रा. मिलिंद पवार यांनी केले.

Web Title: To make life beautiful, you should read books: Vijaykumar Mithi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.