पाटोदा उपबाजारात सोमवारी मका, सोयाबीन अन‌् भुसारधान्य लिलाव शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 10:09 PM2020-10-18T22:09:26+5:302020-10-19T00:21:18+5:30

येवला : येवला कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पाटोदा उपबाजार येथे हंगाम सन २०२०-२१ करीता मका, सोयाबीन व भुसारधान्य शेतीमाल खरेदीचा शुभारंभ सोमवारी (दि. १९) सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती सभापती उषाताई शिंदे यांनी दिली.

Maize, soybean and cereal auction starts on Monday at Patoda sub-market | पाटोदा उपबाजारात सोमवारी मका, सोयाबीन अन‌् भुसारधान्य लिलाव शुभारंभ

पाटोदा उपबाजारात सोमवारी मका, सोयाबीन अन‌् भुसारधान्य लिलाव शुभारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देउपबाजार पाटोदा येथे मका व भुसारधान्याचे लिलाव

येवला : येवला कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पाटोदा उपबाजार येथे हंगाम सन २०२०-२१ करीता मका, सोयाबीन व भुसारधान्य शेतीमाल खरेदीचा शुभारंभ सोमवारी (दि. १९) सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती सभापती उषाताई शिंदे यांनी दिली.
बाजार समितीच्या संचालक मंडळ व पाटोदा येथील मका व भुसारधान्य खरेदीदार व्यापारी यांचे संयुक्त बैठकीत उपबाजार आवारावर मका, सोयाबीन व भुसारधान्य खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पाटोदा गांव परिसरातील शेतकरी बांधवांनी आपला मका, सोयाबीन व इतर सर्व भुसारधान्य शेतीमाल रास्तभावाने विक्री होण्यासाठी उपबाजार पाटोदा आवारात विक्रीसाठी आणावा असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे. उपबाजार पाटोदा येथे मका व भुसारधान्याचे लिलाव सोमवार ते शनिवार असे आठवड्यातुन ६ दिवस होणार आहेत.
पाटोदा परिसरातील शेतकरी बांधवांनी आपला मका, सोयाबीन व भुसारधान्य आदी शेतमाल वाळवुन व स्वच्छ करुन उपबाजार पाटोदा येथे विक्रीसाठी आणुन बाजार समितीस सहकार्य करावे. वजनमापातील तसेच शेतीमाल पेमेंट बाबतची आपली फसवणुक टाळावी. त्याचप्रमाणे शासनाने मका व भुसारधान्यास अनुदान योजना जाहिर केल्यास अनुदानापासुन कुणीही वंचित राहू नये याकरीता आपला शेतीमाल बाजार समिती मध्येच विक्री करावा असे आवाहन बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे, उपसभापती गणपतराव कांदळकर, पाटोदा उपसमितीचे सभापती मोहन शेलार, सचिव कैलास व्यापारे व संचालक मंडळाने केले आहे.

Web Title: Maize, soybean and cereal auction starts on Monday at Patoda sub-market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.