एका दिवसातच बंद पडले कनाशीतील मका खरेदी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 03:59 PM2020-12-27T15:59:52+5:302020-12-27T16:00:14+5:30

कनाशी : येथे शासनाने दि. २५ डिसेंबर रोजी सुरू केलेले हमीभाव मका खरेदी केंद्र दुसऱ्या दिवसापासून बंद करण्यात आल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

The maize shopping center in Kanashi closed within a day | एका दिवसातच बंद पडले कनाशीतील मका खरेदी केंद्र

एका दिवसातच बंद पडले कनाशीतील मका खरेदी केंद्र

Next
ठळक मुद्देशेतकरी संतप्त : तत्काळ सुरू करण्याची मागणी

कनाशी येथील आदिवासी सहकारी सोसायटी आवारात २५ डिसेंबर रोजी मका खरेदीचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यादिवशी सात ट्रॅक्टर व एक पिकअप वाहनातील मका खरेदी करण्यात आला. लगेच दुसऱ्या दिवशी मका खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मका उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कनाशी परिसरात मक्याचे उत्पादन अधिक झाले आहे. मोठ्या प्रमाणात मका शिल्लक असल्याने शासनाकडून मका खरेदी प्रकिया बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. सदर मका खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी किरण निखाडे, नथू बहिरम, किरण बोरसे, धर्मा पवार, मोतीलाल गायकवाड, पोपट गायकवाड, कारभारी बागुल, प्रशांत पवार, नारायण पवार, मधुकर पवार, सुनील देसाई, कैलास राऊत, लक्ष्मण राऊत आदींसह शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Web Title: The maize shopping center in Kanashi closed within a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.