फुले विद्यालयात महाराजस्व अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:07 PM2019-09-17T23:07:00+5:302019-09-18T00:25:34+5:30

महाराजस्व अभियान कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले शाळेतच देण्यात येणार आहेत.

Maharajaswas campaign at Phule school | फुले विद्यालयात महाराजस्व अभियान

सिन्नर येथील महात्मा फुले विद्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ नायब तहसीलदार दिलीप पवार, सी.बी. मरकड, वंदना साळुंके, तानाजी ढोली, कविता गोळेसर, एकनाथ माळी आदी.

Next

सिन्नर : महाराजस्व अभियान कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले शाळेतच देण्यात येणार आहेत. येथील सगर प्रसारक शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयात दाखल्यांचे वितरण करून उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ यांच्या हस्ते दाखल्यांचे वितरण करण्यात आले. नायब तहसीलदार दिलीप पवार, सी.बी. मरकड, प्राचार्य वंदना साळुंके, उपप्राचार्य तानाजी ढोली, प्रा. कविता गोळेसर, प्रा. एकनाथ माळी आदी उपस्थित होते. अधिवास, डोंगरी दाखल्यांचे वितरण यावेळी झाले. विद्यार्थ्यांचे दाखले तयार करण्यात आले आहेत.
इयत्ता आठवी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांना अभियानातून दाखले वितरित होणार आहेत. उत्पन्न, वय, अधिवास, राष्टÑीयत्व, अप्रगत, डोंगरी, जात प्रमाणपत्र हे दाखले देण्यात येत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांकडून आवश्यक ती कागदपत्रे शालेयस्तरावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
८१ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना लाभ
सिन्नर शहरातील वाजे विद्यालय, फुले विद्यालय, चांडक कन्या, भिकुसा हायस्कूल या विद्यालयांसह तालुक्यातील देवपूर, पंचाळे, मºहळ, निºहाळे, दोडी बुद्रुक, दापूर, वावी, पांगरी, पाथरे, कुंदेवाडी, शहा, बारागांवपिंप्री, नायगाव, मनेगाव, पाटोळे, गोंदे, धुळवाड, नांदूरशिंगोटे, चास, ठाणगाव, पिंपळे, पाडळी, आगासखिंड, सिन्नर महाविद्यालय, मिठसागरे, खंबाळे, भोकणी, डुबेरे, दातली, पास्ते, सोनांबे, मानोरी, वडांगळी, दहीवाडी, शिवडे, सोमठाणे, हिवरे, गुळवंच, धोंडबार, ब्राह्मणवाडे, कोमलवाडी, चिंचोली, विंचूरदळवी, वडझिरे, सायाळे, कोनांबे, कासारवाडी, माळेगाव, मीरगाव येथील विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयात दाखल्यांचे वितरण होणार आहे.

Web Title: Maharajaswas campaign at Phule school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.