स्वस्तास सोन्याचा देण्याचे आमिष; ७५ लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:11 AM2021-06-23T04:11:26+5:302021-06-23T04:11:26+5:30

याबाबत पेठरोड आरटीओ कार्यालयाजवळ राहणाऱ्या ईश्वर त्रिभुवन गुप्ता या आडत्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार ...

The lure of giving cheap gold; Ganda to 75 lakhs | स्वस्तास सोन्याचा देण्याचे आमिष; ७५ लाखांना गंडा

स्वस्तास सोन्याचा देण्याचे आमिष; ७५ लाखांना गंडा

Next

याबाबत पेठरोड आरटीओ कार्यालयाजवळ राहणाऱ्या ईश्वर त्रिभुवन गुप्ता या आडत्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार मातोरी येथे राहणाऱ्या मदन मोतीराम साळुंके व संतोष (पूर्ण नाव माहीत नाही) या दोघांवर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सोमवारी सकाळच्या सुमाराला बाजार समितीत ही घटना घडली आहे.

गुप्ता आडते असून मातोरी येथे राहणाऱ्या साळुंके व त्याचा साथीदार संतोष यांनी गुप्ता यांना फोन करून विश्वासात घेऊन आमच्याकडे अडीच किलो सोने आहे ते स्वस्तात द्यायचे आहे, असे म्हणून ते पेठरोड बाजार समितीत आले व त्यावेळी गुप्ता यांनी दुकानात ठेवलेली ७५ लाख रुपये असलेली काळ्या रंगाची बॅग घेऊन ते पसार झाले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे, तर गुन्हे शाखेने दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे ७५ लाख रुपयांची रक्कम जप्त केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The lure of giving cheap gold; Ganda to 75 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.