लालपाडीत बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 02:32 PM2020-02-28T14:32:10+5:302020-02-28T14:32:25+5:30

चांदोरी : गोदाकाठ भागातील लालपाडी येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

 Lollipop in the red carpet | लालपाडीत बिबट्या जेरबंद

लालपाडीत बिबट्या जेरबंद

Next

चांदोरी : गोदाकाठ भागातील लालपाडी येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गोदाकाठ भागात नेहमीच बिबट्याचा वावर असतो. काही दिवसांपासून निफाड तालुक्यातील लालपाडी एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. या संदर्भात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून येताच स्थानिक नागरिकांनी संबंधित माहिती दिली. याची दखल घेऊन वन परिक्षेत्र अधिकारी भंडारी यांनी विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. लालपाडी येथील माणिक जगन्नाथ सानप यांच्या शेतात बसविलेल्या पिंजऱ्यात मागील मंगळवारी रोजी बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं. तसेच शुक्र वारी पहाटेच्या सुमारास याच शेतात लावलेल्या पिंजºयात बिबटयाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेले आहे. पिंजºयात अडकलेली बिबट मादी असून तिचे वय साधारण चार वर्षे आहे.या जेरबंद मादीला निफाड येथील प्राणी नर्सरी येथे सुरक्षितपणे हलविण्यात आले आहे. नंतर पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्याकडून शारीरिक तपासणी करून पून्हा जंगलात सोडणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी दिली तसेच दारणसांगवी - लालपाडी शिवारात आणखी दोन बिबटया असल्याचा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करीत आहे. या संदर्भात वन विभागाने विशेष लक्ष देण्याची मागणी आता स्थानिक लालपाडी ग्रामस्थ करीत आहे.  यावेळी येवल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, जी. बी. वाघ, वनपाल मनमाद ,व्ही. आर. टेकनर, वनरक्षक विंचूर ,भैय्या शेख, वनसेवक बोराडे, वनसेवक ,ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title:  Lollipop in the red carpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक