लोकमत इम्पॅक्ट: निवृत्तिनाथांना प्रवासभाड्याचा ‘रिटर्न चेक’; एसटी महामंडळाला सुबुद्धी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 01:47 AM2020-07-02T01:47:07+5:302020-07-02T07:04:09+5:30

परिवहनमंत्री अनिल परब यांनी या साऱ्या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला असून, संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. नाशिक आगाराने संस्थानकडून ७१ हजार रुपयांचे भाडे घेतल्यानंतर बस उपलब्ध करून दिली.

Lokmat Impact: Return check for Nivruttinath; Wisdom to ST Corporation | लोकमत इम्पॅक्ट: निवृत्तिनाथांना प्रवासभाड्याचा ‘रिटर्न चेक’; एसटी महामंडळाला सुबुद्धी

लोकमत इम्पॅक्ट: निवृत्तिनाथांना प्रवासभाड्याचा ‘रिटर्न चेक’; एसटी महामंडळाला सुबुद्धी

Next

नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठूमाउलीच्या भेटीसाठी त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी घेऊन गेलेल्या संस्थानकडून शिवशाही बसचे प्रवासभाडे आकारणी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराला महागात पडली आहे. लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वारकरी सांप्रदायातून रोष व्यक्त होऊ लागल्यानंतर आगाराने संस्थानला प्रवासभाड्याचा धनादेश परत केला.

परिवहनमंत्री अनिल परब यांनी या साऱ्या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला असून, संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. नाशिक आगाराने संस्थानकडून ७१ हजार रुपयांचे भाडे घेतल्यानंतर बस उपलब्ध करून दिली.

सोशल माध्यमातूनही महामंडळावर प्रचंड रोष व्यक्त झाला. या साºया प्रकाराची दखल अनिल परब यांनी घेतली. तातडीने सदर प्रवासभाड्याची रक्कम संस्थानला परत करण्याचे आदेश काढले. त्यानुसार, मुंबईतील राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून नाशिक आगाराला आदेश मिळाले आणि विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी तातडीने त्र्यंबकेश्वर गाठत संस्थानला प्रवासभाड्याचा रिटर्न चेक देऊन दिलगिरी व्यक्त केली. संस्थानने दिलेला धनादेश वटला गेल्यामुळे महामंडळाला स्वत:चा धनादेश तयार करून द्यावा लागला. पुजारी जयंत महाराज गोसावी यांनी सदर धनादेश स्वीकारत महामंडळाला आभारपत्र दिले.

संतांच्या पालख्या शिवशाही बसने मोफत घेऊन जाण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या असतानाही नाशिक आगाराने भाडे वसूल करणे चुकीचे होते. दोषींवर कारवाई करण्यात येईल. - अनिल परब, परिवहनमंत्री

शासनाकडे आम्ही बस मोफत मिळण्यासाठी विनंतीपत्रे दिली होती. परंतु, जिल्हा प्रशासनाकडून तसा आदेश नसल्याचे सांगितल्याने संस्थानने प्रवासभाडे भरले होते. महामंडळाने पैसे परत दिले. माउलीनेच त्यांना सुबुद्धी दिली. - पवनकुमार भुतडा, अध्यक्ष, निवृत्तिनाथ संस्थान, त्र्यंबकेश्वर

Web Title: Lokmat Impact: Return check for Nivruttinath; Wisdom to ST Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.